बीड

तथागत बुद्ध विहारात बुद्ध जयंती उत्साहात

तथागत बुद्ध विहारात बुद्ध जयंती उत्साहात

जामखेड | प्रतिनिधी
शहरातील तपनेश्वर परिसरातील श्री नागेश विद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या तथागत बुद्ध विहार येथे दि. १ मे २०२६ रोजी वैशाख पौर्णिमा व बुद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात बुद्धवंदना व त्रिशरण पंचशीलाने झाली. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक बौद्धाचार्य आयु. बलभीम जावळे व महिला सरचिटणीस आयु. सुरेखा अनिल सदाफुले यांच्या हस्ते बुद्धवंदना घेण्यात आली.

यावेळी उपस्थितांनी भगवान बुद्धांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी बौद्धाचार्य जावळे म्हणाले, धम्माच्या माध्यमातून सामाजिक एकात्मता बळकट करणे ही काळाची गरज आहे.विविध उपक्रमांद्वारे बौद्ध धम्माचा प्रसार सुरू असून, बुद्धांच्या विचारांच्या आधारे समाजात शांतता, समता व बंधुता प्रस्थापित करण्याचे त्यांनी आवाहन केले.जावळे हे सातत्याने समाज कार्यात कार्यरत असतात.

या कार्यक्रमासाठी बौद्ध उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. समारोपात उपस्थित उपासिकांना खीरचे वाटप करण्यात आले.

Back to top button