हज इन्स्पेक्टर पदी शकील बागवान यांची नियुक्ती

हज इन्स्पेक्टर पदी शकील बागवान यांची नियुक्ती
जामखेड : मुस्लिम बांधवांच्या अत्यंत पवित्र हज यात्रेदरम्यान यात्रेकरूंना योग्य सुविधा, मार्गदर्शन व सुरक्षित सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सेन्ट्रल हज कमिटी व महाराष्ट्र राज्य हज कमिटी यांच्या माध्यमातून हज इन्स्पेक्टर (एस.एच.आय.) पदी निवड होऊन सौदी अरेबिया येथे सेवेसाठी रवाना होत असल्याबद्दल जामखेड येथील शकील अहमद अब्बास बागवान यांचा सन्मान करण्यात आला.
हज यात्रेकरूंच्या सेवेसाठी हज इन्स्पेक्टर म्हणून बागवान यांची नियुक्ती करण्यात आली असून या निमित्ताने महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे माजी संचालक तथा भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सलीम बागवान यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कारी साहब, समीर खान साहब, अय्यूब भाई बागवान यांच्यासह शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.



