बीड

सुन नाही तर ‘मुलगी’ म्हणून सन्मान – मुरूमकर कुटुंबाचा आदर्श

सुन नाही तर ‘मुलगी’ म्हणून सन्मान – मुरूमकर कुटुंबाचा आदर्श
जामखेड येथे विवाह सोहळा ठरला आदर्श व प्रेरणादायी
जामखेड प्रतिनिधी :मानवी मूल्यांचा अद्भुत संदेश देणारा आणि रूढी मोडणारा विवाहसोहळा जामखेड येथे उत्साहात पार पडला. पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांचे चिरंजीव प्रतीक उर्मिला भगवान मुरूमकर यांचा विवाह श्रीमती मंगल तसेच कै.हनुमंत रामचंद्र चिंचकर यांची जेष्ठ कन्या चि.सौ.कां. स्नेहल हिच्यासोबत नुकताच संपन्न झाला.
या विवाहाची सर्वाधिक चर्चेतील बाब म्हणजे स्नेहल हिच्या वडीलांचे निधन झाले असले तरी वधूला ‘सुन’ म्हणून नव्हे, तर ‘स्वतःची मुलगी’ म्हणून मुरूमकर कुटुंबाने केवळ सुन म्हणून नाही, तर मुलगी म्हणून येत आहे असे जाहीरपणे सांगितले. उपस्थित
   या विवाह सोहळ्याला महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, आष्टी-शिरूर पाटोदा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस, अखिल भारतीय वारकरी संघटनेचे राष्ट्रीय हभप प्रकाश (महाराज) बोधले,मराठा गौरव युवराज (उस्ताद) काशिद, उपमहाराष्ट्र केसरी बबन काशिद तसेच विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, व्यावसायिक, ग्रामस्थ, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   हक्काच्या माणसाला हक्काचे प्रेम
या विवाहाची आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे, आपल्या हक्काच्या माणसाच्या आणि सामान्यांच्या लग्न सोहळ्याला एका हाकेवर हजारोंचा जनसमुदाय उपस्थित राहिला. कोणतेही मोठे आमंत्रण किंवा दिमाखदार जाहिराती नसतानाही, फक्त प्रेमाच्या आणि नात्याच्या नात्याने लोकांनी स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहून विवाह सोहळ्याची शोभा वाढवली.
उपस्थित पाहुण्यांनी मुरूमकर कुटुंबाच्या या आदर्श निर्णयाचे कौतुक करत, समाजाला दिशा देणारा आणि नात्यांचे खरे मूल्य सांगणारा विवाह अशी प्रतिक्रिया दिली. वधू-वरांना सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव झाला.
Back to top button