बीड
जावळे येथे महाशिवरात्रीनिमित्त भव्य तीन दिवसीय धार्मिक-सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

जावळे येथे महाशिवरात्रीनिमित्त भव्य तीन दिवसीय धार्मिक-सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
हजारो भाविकांची उपस्थिती राहणार
श्रीवर्धन (संदेश घोलप):
श्रीवर्धन तालुक्यातील स्वयंभू श्रीक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या जावळे गावातील बेलेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीनिमित्त भव्य तीन दिवसीय धार्मिक-सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा भक्तिमय सोहळा शनिवार दि. १४ फेब्रुवारी २०२६ ते सोमवार दि. १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.यंदा हे 36 वे वर्ष असून विशेष म्हणजे गेल्या 36 वर्षांपासून जावेळे सार्वजनिक महाशिवरात्री उत्सव मंडळ तर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते,
महोत्सवाची सुरुवात शनिवार दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १०.३० वाजता श्रीवर्धन येथील सुभाष अंजार्लेकर (भट्टीचामाळ) यांच्या शिवलीलामृत ग्रंथ वाचनाने होणार आहे.
रविवार दि. १५ फेब्रुवारी २०२६ (महाशिवरात्री) रोजी पहाटे सकाळी ५.०० वाजता काकड आरती होणार असून, सकाळी ७.३० वाजता स्वयंभू शंकराच्या प्रतीमेची संपूर्ण गावातून पालखी मिरवणूक भक्तिमय वातावरणात काढण्यात येणार आहे
दुपारी १२.०० वाजता महाआरती श्रीवर्धनचे प्रख्यात व्यापारी कोठारी ब्रदर्स यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
यानंतर दुपारी २.०० वा श्री धारेश्वर प्रासादिक भजन मंडळ, धारवली यांचे भजन (प्रमुख वक्ते – श्री. दत्ताराम सुर्वे),
दुपारी ४.०० वाजता जागृती महिला मंडळाच्या वतीने हळदी-कुंकू समारंभ,
संध्याकाळी ६.०० वाजता आरती
तसेच रात्री ९.३० वाजता शालेय मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सोमवार दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी
सकाळी ८.०० वाजता शालेय मुलांच्या क्रीडा स्पर्धा,
त्यानंतर दुपारी १२.३० ते ३.०० वाजेपर्यंत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाचे आयोजन जावळे स्थानिक व मुंबई मंडळ, जावळे महिला मंडळ, नवरात्र उत्सव मंडळ व शिवशक्ती क्रिकेट मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून, गावातील तरुण, महिला व ज्येष्ठ नागरिक अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
महोत्सवानिमित्त संपूर्ण जावळे गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले असून मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आला आहे. भाविकांसाठी स्वच्छता, पिण्याचे पाणी व शिस्तबद्ध दर्शन व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.
परिसरातील तसेच दूरवरून येणाऱ्या भाविकांनी या पावन पर्वणीचा लाभ घेऊन भगवान स्वयंभू शिवशंकराचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
हा महाशिवरात्री महोत्सव धर्म, परंपरा, भक्तीभाव व सामाजिक एकोपा यांचे सुंदर दर्शन घडवणारा ठरणार असून जावळे गावासाठी अभिमानास्पद ठरत आहे.


