बीड

आमदार बाबाजी काळे यांची आळंदीतील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत सदिच्छा भेट

आमदार बाबाजी काळे यांची आळंदीतील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत सदिच्छा भेट

*आमदार बाबाजी काळे यांचा आळंदीतील ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ*

आळंदी – आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेस खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी आमदार बाबाजी काळे यांचा वाढदिवसानिमित्त श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ, मोत्यांची माळ, माऊलींची मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

माऊलींच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रास्ताविकामध्ये श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांनी आमदार बाबाजी काळे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या सर्व घटकांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त केल्या. प्रशालेतील विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगत व्हावेत, यासाठी आमदार बाबाजी काळे यांचेकडे संगणक संच मिळणेसाठी मागणी केली. याप्रसंगी राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक रामदास आबा धनवटे आळंदीचे माजी नगरसेवक उत्तम गोगावले, उद्योजक बाबाजी गवारी, श्याम पवार, शाळेचे प्राचार्य किसन राठोड, मुख्याध्यापक प्रदीप काळे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार बाबाजी काळे यांनी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या सर्व घटकांच्या वतीने वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन सत्कार केला, त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच महाराष्ट्राच्या विविध भागांमधून आळंदीमध्ये वारकरी शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्याचे महान कार्य श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अखंडपणे चालू आहे, अशा शब्दांत आमदार बाबाजी काळे यांनी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. आमदार म्हणाले“आई-वडिलांबरोबरच गुरूंचेही जीवनात मोठे स्थान आहे. त्यांच्या मार्गदर्शनातूनच विद्यार्थी चांगला नागरिक बनतो”. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून “चांगले शिका, चांगले मोठे व्हा आणि समाजासाठी काम करा,” असे आवाहन केले. संस्थेच्या व शाळेच्या विकासासाठी आपण सदैव मदत करण्यास सकारात्मक भूमिका घेऊ, असे आश्वासन दिले.

Back to top button