बीड
प्रचंड पावसाने शेतकऱ्यांची काढणीयोग्य पिके पाण्यात तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करा- उल्हास गिराम

प्रचंड पावसाने शेतकऱ्यांची काढणीयोग्य पिके पाण्यात
तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करा- उल्हास गिराम
बीड (प्रतिनिधी ) जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पिकांची अवस्था वाईट झाली होती त्यातच परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची उभी व काढणीयोग्य पिके उध्वस्त झालेली असून शेतकऱ्यांना या या अस्मानी संकटातून बाहेर काढण्यासाठी महायुती सरकारने तात्काळ बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख उल्हास गिराम यांनी केली आहे
आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई तालुक्यातील जवळपास सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे मुख्य नद्या व उपनद्याना आलेल्या महापुरामुळे काही शेतकऱ्यांच्या जमिनीतील माती खरडून वाहून गेली आहे. शेतामध्ये पुराचे पाणी साचून राहिल्याने पिके व फळबागांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अती पावसामुळे रस्त्यावरील पूल वाहून गेले आहेत असून घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे त्यातच विजेचे खांब कोसळल्या मुळे लोकांना अंधारात रहावे लागत आहे अनेक शेतकऱ्यांच्या पशुधनाची ही जीवित हानी झाली आहे. अनेक शेतकऱ्याने शेती साठी कर्जे काढून बी बियाणे, खते, औषधी खरेदी केलेली होती पिके जोमात असतानाच या अस्मानी संकटाने हाता तोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे आधीच आर्थिक संकटात असलेला शेतकरी या संकटामुळे पुरता हवालदिल झाला असून त्यांना तात्काळ मदत मिळणे गरजेचे आहे पण प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात व्यस्त आहे महायुती सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना सरसकट मदत देऊन बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा नसता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा जिल्हा प्रमुख उल्हास गिराम यांनी दिला आहे



