संपादकीय
नांदुर घाट आठवडी बाजार मूळ जागेवर भरवावा ग्रामविकास फाउंडेशन ची ग्रामपंचायतला निवेदनाद्वारे मागणी

नांदुर घाट आठवडी बाजार मूळ जागेवर भरवावा
ग्रामविकास फाउंडेशन ची ग्रामपंचायतला निवेदनाद्वारे मागणी

नांदुर घाट प्रतिनिधी.
श्रीकांतराजे जाधव.
नांदुर घाट येथील बाजारपेठ शेकडो वर्षापासून नांदूर तसेच पंचक्रोशीतील 25 ते 30 गावाची उलाढाल बाजार व व्यापारामधून होत असते. नांदुर घाट केज तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेमध्ये छोटे मोठे व्यापारी शेतकरी शेतमजूर यांच्या माध्यमातून मोठी उलाढाल चालत असते. आठ ते दहा वर्षापासून पणन महासंघाच्या मार्फत करोडो रुपयाचा निधी बाजारतळ सुशोभीकरणासाठी वापरला त्यामधून पूर्वनियोजित भाजीपाल्याचा बाजार मारुती मंदिर शेजारी भरला जायचा परंतु नियोजित विकास कामामुळे भाजीपाल्याचा बाजार देशी दारू व मटका व अन्य चुकीच्या ठिकाणी भरवला जात असल्यामुळे महिलांना ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास वर्षानुवर्ष होत आहे. त्यामुळे भाजीपाल्याचा बाजार मारुती मंदिरात शेजारी पूर्वनियोजित जागेवर भरवावा यासाठी ग्रामविकास फाउंडेशन चे अध्यक्ष अमोल यादव. उपाध्यक्ष दत्ता जाधव. सचिव संतोष मालदार जाधव. प्रा. सतीश मोराळे .सौदागर सर जाधव . शिवाजीराव जाधव. सचिन जाधव. जावेद भाई शेख. गजानन सातपुते. शहाजी गायके. प्रदीपदादा जाधव. अँड हनुमंत जाधव.धनंजय जाधव पद्माकर जाधव. औदुंबर सगरे व गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत नांदुर घाट सरपंच ग्रामसेवक यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
……..
नांदुर घाट येथील व परिसरातील महिला आठवडी बाजार मंगळवारी बाजार निमित्त येत असताना भाजीपाल्याचा बाजार चुकीच्या ठिकाणी असल्यामुळे दारू पिणारे मटका खेळणारे लोकांमुळे महिलांना भयंकर त्रास होत आहे तात्काळ ग्रामपंचायतीने पूर्वनियोजित जागेवर भाजीपाल्याचा बाजार भरवावा.
राधाताई धनंजय जाधव.
ग्रामपंचायत सदस्य नांदुर घाट.



