आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत कार्तिकी मिसाळ हिची निवड झाल्याबद्दल मातृभूमी प्रतिष्ठान कडून सन्मानित
बीड (प्रतिनिधी ) :ब्राझील येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी ‘ वर्ल्ड स्कूल गेम्स 2026’ ची राष्ट्रीय तायक्वांदो पदक विजेती,
राज्यातील एकमेव महिला खेळाडू, पोद्दार इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी कु. कार्तिकी संदीप मिसाळ हिची मुलींच्या 68 किलो वरील वजन गटामध्ये भारतीय संघात निवड झाल्याबद्दल मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने दि. 19 सप्टेंबर 2026 शनिवार रोजी तिचा सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब जायभाये यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन राज्यस्तरीय क्रीडा रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.यावेळी पोलीस उपनिरीक्षक वासुदेव मिसाळ, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय तांदळे, लक्ष्मण चाटे, बाजीराव ढाकणे, कुंडलिक पालवे, गोरखनाथ मिसाळ, कार्तिकीचे पालक सौ. शितल मिसाळ व श्री संदीप मिसाळ आदींची उपस्थिती होती.