बीड

डबड्या मेंदूच्या लोणीकरांवर कारवाई करा – गणेश बजगुडे पाटील

डबड्या मेंदूच्या लोणीकरांवर कारवाई करा – गणेश बजगुडे पाटील
भाजप नेते बबनराव लोणीकर यांचा बीड तालुका काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध
बीड / भारतीय जनता पक्षाचे नेते परतुर विधानसभा मतदार संघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा व महिला भगिनीबद्दल अतिशय क्लेशदायक वक्तव्य करून आपल्या डबड्या झालेल्या मेंदूतील लोणीपाजरन्याचे काम केले असुन या वक्तव्याचा गणेश बजगुडे पाटील यांनी बीड तालुका काँग्रेस कमिटी व शिवक्रांतीच्या वतीने तीव्र निषेध केला.
     ज्या मायबाप जनतेने लोणीकर यांना विधानसभेत पाठवले त्यांच्यावर अतिशय खालच्या पातळीचे वक्तव्य करत शेतकऱ्यांच्या अंगावरचे कपडे, चप्पल, बुट व तो डबडा मोबाईल हे सर्व मोदी सरकरणे शेतकऱ्यांना वर्षाला दिलेले सहा हजार व लाडक्या बहिणीच्या पैशातून येते असे अतिशय चुकीचे विधान केलेले असून या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे पाटील म्हणाले की, निवडणुकीच्या काळात शेतकरी कर्ज माफी करु म्हणणारे भारतीय जनता पक्ष ज्या शेतकऱ्यांच्या व माय माऊलीच्या आशीर्वादाने सत्तेत आले आज ते शेतकऱ्यांना भिकाऱ्याची उपमा देत आहेत. सरकार हे जनतेने निवडून दिलेले असताना व लोकशाहीत जनताच मायबाप असते परंतु भाजपच्या नेत्यांना सरकार म्हणजे खाजगी मालमत्ता वाटत असेल तर येणाऱ्या काळात मायबाप जनता त्यांना धडा शिकवेल परंतु लोणीकर यांना आमचे सांगणे आहे की, माझ्या बापाचा मोबाईल डबडा नाहीतर तुमचा मेंदू डबडा झालेला आहे. तुमच्या अंगावरील कपडे, गाडी, चप्पल बुट सर्व त्याच शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने मिळालेले आहे. बळीराजाच्या मालाला योग्य हमीभाव द्या, निवडणुकीत संपुर्ण कर्जमाफीच्या केलेल्या मोठ मोठ्या वल्गना यावर कधी तरी बोलावं शेतकरी मोठ्या मनाचा बाप माणूस आहे तो तुमच्या डबड्या योजनेला कधीही भिक घालत नसुन लोणी करांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे गणेश बजगुडे यांनी केले आहे.
Back to top button