जामखेडमध्ये ‘स्टॅंडर्ड ॲक्वा वॉटर’चे उद्घाटन; सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

जामखेडमध्ये ‘स्टॅंडर्ड ॲक्वा वॉटर’चे उद्घाटन; सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ
जामखेड प्रतिनिधी –जामखेड शहरातील बीड रोडवरील महावितरण कार्यालयासमोर तसेच पूर्णवादी बँक समोर, अल्पना मेडिकल शेजारी शुद्ध व थंड पाण्याचे ‘स्टॅंडर्ड ॲक्वा वॉटर दालन’ शहरातील प्रसिद्ध व्यापारी हाजी मंजूर सय्यद यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आले. या दालनाचे उद्घाटन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या शुभहस्ते पार पडले.
या वेळी भाजपा ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, मुस्लिम पंच कमिटीचे उपाध्यक्ष हाजी मंजूर सय्यद, युवक काँग्रेसचे राहुल उगले,भाजपा शहर मंडल अध्यक्ष संजय काशिद,विनायक राऊत, मनोज कुलकर्णी, पोपट राळेभात, ॲड. जैद सय्यद, वाजिद सय्यद, गणेश सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान प्रा. राम शिंदे यांनी हाजी मंजूर सय्यद यांच्या सामाजिक व व्यवसायिक कार्याचे कौतुक करत सांगितले की, शुद्ध पाण्याची उपलब्धता ही काळाची गरज असून, ‘स्टॅंडर्ड ॲक्वा’ सारख्या उपक्रमांमुळे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहील.
या ठिकाणी नागरिकांना शुद्ध व थंड पाण्याची सुविधा उपलब्ध असून, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे दालन उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.



