जामखेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठिकठिकाणी अभिवादन

जामखेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठिकठिकाणी अभिवादन
संविधानामुळेच ताठ मानेने जगणे शक्य – दशरथ चौधरी
जामखेड प्रतिनिधी: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार विशाल असून ते एका शब्दात मांडणे अशक्य आहे. आज आपण समाजात ज्या पदांवर कार्यरत आहोत, ते केवळ डॉ. आंबेडकरांच्या कार्यामुळेच,असे प्रतिपादन जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी केले.
जामखेड शहरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. यामध्ये मिलिंद नगर,महात्मा फुले नगर,सिद्धार्थ नगर,समता नगर, संविधान चौक,सदाफुले वस्ती तसेच खर्डा चौक येथे जामखेड नगर परिषद, वकील बार संघ,आम आदमी पार्टी,रोटरी क्लब, जामखेड तालुका डॉक्टर असोसिएशन यांच्या वतीने मोठ्या उत्साहात आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
पुढे बोलताना चौधरी म्हणाले, देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून भक्कम पाया घातला. लोकशाहीच्या आधारावरच आज आपण ताठ मानेने जीवन जगत आहोत.महामानवांचे विचार घराघरात पोहोचवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी ॲड.डाॅ.अरुण जाधव, मुख्याधिकारी अजय साळवे,नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, अमित चिंतामणी,संध्या सोनवणे,आकाश बाफना आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तथा नगरसेवक ॲड.डाॅ.अरुण जाधव,शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने, भाजप शहर मंडल अध्यक्ष संजय काशिद,वकील बार संघाचे अध्यक्ष ॲड.हर्षल डोके, जेष्ठ शिक्षक हरिभाऊ कदम,आम आदमी पार्टी चे संतोष नवलाखा,मुख्याधिकारी अजय साळवे, सलिम बागवान,प्रवक्ते बापूसाहेब ओव्होळ, मनसे तालुका उपाध्यक्ष सनी सदाफुले,युवा नेते आकाश बाफना,जामखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, गटनेते तात्याराम पोकळे,बांधकाम समितीचे सभापती मोहन पवार, श्रीराम डोके, ॲड.प्रविण सानप,प्राचार्य तथा नगरसेवक विकी घायतडक, नगरसेवक राजेंद्र गोरे, नगरसेवक महेश निमोणकर, नगरसेवक वसिम सय्यद,नगरसेविका नंदा होळकर, नगरसेविका संगीता भालेराव,माजी नगरसेविका विद्या वाव्हळ,माजी नगरसेवक दिगंबर चव्हाण, अमित चिंतामणी,राष्ट्रवादीच्या संध्या सोनवणे,नगरसेवक पवन राळेभात, प्रविण चोरडिया, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले,इस्माईल सय्यद,दिपक सदाफुले, राजेश वाव्हळ, प्रकाश काळे, अशोक शेळके, गणेश काळे,अमोल सदाफुले,सलीम बागवान,अर्जुन म्हेत्रे,बौध्दाचार्य अशोक आव्हाड,बलभिम जावळे,अजय भोसले, विशाल अब्दुले,बजरंग सरडे,राणा सदाफुले,संतोष गव्हाळे, सागर टकले,राजन समिंदर,अनिल सदाफुले, नामदेव गंगावणे,सुनील जावळे,सुरेखा रत्नाकर सदाफुले, सुरेखा सदाफुले,बाबा सोनवणे,जितेंद्र आढाव,संग्राम कदम, रजनीकांत साखरे, जयदीप शिंदे,सुशिल पोळ, विनोद घायतडक,दिपक तुपेरे, सचिन सदाफुले, उपेंद्र आढाव, विनोद सोनवणे विजय साळवे आदी उपस्थित होते.



