बीड
आता तरी वडशेत वावे धरण बनणार १४० कोटींचा फुगा पुन्हा फुटणार?

आता तरी वडशेत वावे धरण बनणार १४० कोटींचा फुगा पुन्हा फुटणार?
“२५ वर्षांत २२ कोटींचा चुराडा!प्रकल्पाचा पुरता भुगा!
श्रीवर्धन तालुक्यातील ‘वडशेत-वावे’ धरणावर पुन्हा एकदा १४० कोटी रुपयांचा फुगा फुगवण्यात आला आहे!धरणासाठी तब्बल १४० कोटींचा निधी मंजूर झाले आहेत. १ ऑक्टोबर २०२६ रोजी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार सुनील तटकरे साहेबांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकही पार पडली. पण आज अख्खा श्रीवर्धन तालुका एकच सवाल विचारतोय– ‘२२ कोटी पाण्यात घालवल्यानंतर, आता १४० कोटींनी तरी धरण बनणार… की हा केवळ निवडणुकीचा फुगा फुटणार?'”
“आता जरा या प्रकल्पाचा इतिहास आणि प्रशासनाचा आकड्यांचा खेळ पाहुयात! सन २००१ मध्ये जेव्हा या योजनेला मंजुरी मिळाली, तेव्हा खर्च होता अवघा ९ कोटी १० लाख रुपये. सरकारी कागदपत्रांनुसार ऑगस्ट २०१८ पर्यंत तब्बल २२ कोटी २० लाख रुपये खर्च झाल्याची नोंद झाली. पण जमिनीवर काय आहे? धरणात पाण्याचा थेंब नाही, कालवे फुटलेत आणि प्रकल्पाचा पुरता बट्ट्याबोळ झाला आहे!
मूळ ९ कोटींचा प्रकल्प २५ वर्षांत थेट १४० कोटींवर कसा पोहोचला? खासदार सुनील तटकरे, नामदार अदितीताई तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रयत्नाने निधी मंजूर झाल्याचा दावा केला जात असला, तरी ‘हा १४० कोटींचा फुगा पुन्हा ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी तर नाही ना?’ अशी शंका स्थानिक नागरिक विचारत आहेत!”
“एकीकडे १४० कोटींचे फुगे फुगवले जात आहेत, तर दुसरीकडे जमिनीवर मात्र शेतकऱ्यांची क्रूर थट्टा सुरू आहे! अवघ्या १००० रुपये एकरी दराने जमिनी लाटल्या गेल्या आणि बाधितांना अजून योग्य मोबदलाही मिळालेला नाही.
कोणतीही परवानगी न घेता, शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय सुपीक शेतात पोकलेन घुसून अनधिकृत कालवे खोदले गेले आहेत
आदेश तर निघाले, पण मूळ प्रश्न उरतोच… २५ वर्षांत २२ कोटींचा फुगा फुटून ज्यांचे खिसे गरम झाले, तेच अधिकारी आणि कंत्राटदार या १४० कोटींचा पुन्हा भुगा करणार नाहीत कशावरून?”
“शेवटी आमचे प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना ३ थेट सवाल आहेत…
१. मागील २२ कोटींच्या घोटाळ्याची आणि निकृष्ट कामाची चौकशी होणार का?
२. १४० कोटींच्या या बजेटमधून बाधित शेतकऱ्यांना सुधारित मोबदला वेळेत मिळणार का?
३. ८ गावांतील ४२३ हेक्टर जमिनीला खरोखर पाणी मिळणार… की हा १४० कोटींचा फुगा हवेतच विरणार?
वडशेत-वावे धरणाचा हा १४० कोटींचा फुगा फुटतो की खरोखर पाण्याचा प्रश्न सुटतो, हे पाहणे आता महत्वाचे ठरेल.



