बीड
चौसाळा ग्रामीण रुग्णालयासाठी माजी मंत्री क्षीरसागर यांचे प्रयत्न कामी आले

चौसाळा ग्रामीण रुग्णालयासाठी माजी मंत्री क्षीरसागर यांचे प्रयत्न कामी आले
सरपंच बाबुशेठ लोढांच्या पाठपुराव्याला यश
बीड/प्रतिनिधी:-गेल्या चार वर्षापासून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी चौसाळा ग्रामीण रुग्णालयाच्या निधी मंजुरीसाठी आणि जागा उपलब्धतेसाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्यामुळेच आज 24 कोटी 45 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती चौसाळ्याचे सरपंच बाबुशेठ लोढा यांनी दिली आहे
चौसाळा येथे ग्रामीण रुग्णालय सर्व सोयीनीयुक्त व्हावे यासाठी चौसाळ्याचे सरपंच बाबुशेठ लोढा यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता त्यानुसार माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी चार वेळा बैठका घेऊन तात्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांना याबाबत तातडीने पावले उचलण्यास सांगितले त्यानुसार जिल्हाधिकारी मुधोळ यांनी देखील मोठे सहकार्य केले त्यांच्या कार्यकाळातच ग्रामीण रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करण्यात आली त्यानंतर या ठिकाणी निधी मंजूर करण्यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्रालयात राज्याचे आरोग्य मंत्री,संबंधित खात्याचे सचिव, तसेच ओम प्रकाश शेटे यांच्याकडे सातत्याने याबाबत पाठपुरावा केला, त्यानुसार या रुग्णालयाच्या उभारणीसाठी 24 कोटी 45 लाख रुपये निधी मंजूर झाला असून चौसाळा आणि परिसरासाठी हे रुग्णालय उपयुक्त ठरणार असल्याचे सरपंच बाबुशेठ लोढा यांनी सांगितले या रुग्णालयासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नामुळेच जागा आणि निधी मिळाला असल्याचेही ते म्हणाले


