गौराईच्या आगमनाने घराघरांत आनंदोत्सव, देशमुख परिवारातील गौरी पूजन

चौसाळा / वार्ताहर
महाराष्ट्रातील पारंपरिक गौरी पूजनाचा उत्सव भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गौराईच्या आगमनाने घराघरांत आनंदाचे आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले. महिलांनी गौराईची आकर्षक सजावट करून विधिवत पूजा-अर्चा केली. गौराईला सुंदर वस्त्र, दागिने आणि फुलांनी सजविण्यात आले. विविध नैवेद्य अर्पण करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. या उत्सवामुळे घराघरांत आनंद, उत्साह आणि भक्तीचा संगम पाहायला मिळाला. गौराईच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत भाविकांनी पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा केला.
गौराईला निरोप देताना महिलांच्या डोळ्यांत भावुकता आणि मनात पुढील वर्षी लवकर येण्याची आस दिसून आली. गौराई माता, पुढच्या वर्षी लवकर या ! या भक्तिमय जयघोषात गौराईला निरोप देण्यात आला.
यावेळी उपस्थित अंजली देशमुख. अमृता देशमुख. अश्विनी व देशमुख .स्वामिनी देशमुख परिवार उपस्थित होते
छायाचित्रे अमोल शेटे घेतलेले



