अन्याय करणाऱ्या वृत्तींचा नायनाट करण्यासाठी भगवान परशुरामांना पुन्हा जन्म घ्यावा लागेल – माजी प्राचार्य श्रीकांत होशिंग यांचे प्रतिपादन

अन्याय करणाऱ्या वृत्तींचा नायनाट करण्यासाठी भगवान परशुरामांना पुन्हा जन्म घ्यावा लागेल – माजी प्राचार्य श्रीकांत होशिंग यांचे प्रतिपादन
जामखेड येथे श्री भगवान परशुराम जयंती उत्सव उत्साहात साजरा
जामखेड प्रतिनिधी : “जे लोक सामान्य जनतेचा छळ करतात आणि दुर्बलांवर अन्याय करतात, त्यांचा नायनाट करण्याचे कार्य भगवान परशुरामांनी इतिहासात केले आहे. आजही जर पहलगामसारख्या ठिकाणी जर २७ भारतीयांवर अन्याय होत असेल, तर अशा अनीती वृत्तींना नष्ट करण्यासाठी भगवान परशुरामांना पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल,” असे ठाम प्रतिपादन माजी प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी केले.
जामखेड शहरातील श्रीराम मंदिर येथे श्री परशुराम प्रतिष्ठाण, जामखेड यांच्या वतीने श्री भगवान परशुराम जयंतीनिमित्त ते बोलत होते.मंगळवारी (दि. २९ एप्रिल) सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते भगवान परशुराम यांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले.
पुढे बोलताना होशिंग यांनी भगवान परशुरामांच्या जीवनकार्याचा उल्लेख करत वर्तमान काळातील सामाजिक अन्यायांवर कठोर शब्दांत प्रहार केला. “ज्ञान, शौर्य आणि तपस्वीता यांचे प्रतीक असलेल्या परशुरामांच्या विचारांची आज गरज आहे,” असेही ते म्हणाले.
यावेळी जेष्ठ शिक्षक एकनाथ चांदेकर यांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उध्दवराव देशमुख, जेष्ठ शिक्षक एकनाथ चांदेकर,प्रा.श्रीकांत होशिंग, लक्ष्मीकांत काळे, हनुमंत देशमुख,गिरिधारीलाल ओझा , सखाराम काळे,बापूसाहेब कुलकर्णी, गणेश जोशी, संतोष कुलकर्णी, सुनील होशिंग,प्रमोद दाणी, प्रमोद, कुलकर्णी,दिग्विजय देशपांडे,निलेश देशमुख, धनंजय काळे, सोसायटीचे संचालक हर्षल देशमुख, ओंकार कुलकर्णी, विनोद कुलकर्णी, रोहित देशमुख,बंटी पाटील , अजिंक्य कुलकर्णी,ओम कुलकर्णी आदी मान्यवर व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन देशमुख यांनी केले तर आभारप्रदर्शन विजय कुलकर्णी यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता प्रसाद वाटपाने झाली.



