बीड

प्रजासत्ताक दिनी ना. पंकजाताई मुंडेंनी मांडलं जालन्याच्या विकासाचं व्हिजन

प्रजासत्ताक दिनी ना. पंकजाताई मुंडेंनी मांडलं जालन्याच्या विकासाचं व्हिजन

शासकीय ध्वजारोहण, जिल्हा नियोजन समिती बैठक, विविध लोकोपयोगी कार्यक्रमाचा बिझी शेड्युल

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 359 कोटी 24 लाखांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी

जालना ।दिनांक २६।
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जालना जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन नियोजन बैठकीतून मांडलं. तत्पूर्वी शासकीय ध्वजारोहण, आढावा बैठक आणि विविध लोकोपयोगी कार्यक्रम, संस्थांना तसेच नागरिकांच्या भेटीमुळे त्यांचा दिवसभराचा शेड्युल अक्षरशः बिजी होता.

ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते सकाळी ९.१५ वा. पोलीस परेड ग्राऊंडवर प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण झाले. पोलिस परेड चे निरिक्षण करत त्यांनी मानवंदना स्विकारली.
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना विविध लाभ व पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये पी.एम.ए.वाय घरकुल लाभार्थ्यांना चावी वाटप. ओबीसी महामंडळ व वसंतराव नाईक महामंडळ अंतर्गत ट्रॅक्टर व आयशर वाटप तसेच  भगवान बाळु नरोडे, पोलीस उप निरीक्षक पोलीस ठाणे अंबड यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक प्रदान करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी मल्लखांब कवायती, नृत्य व विविधी कलागुण सादर केले. अंगणवाडीतील चिमुकल्यांनी सादर केलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा ने पालकमंत्री भारावून गेल्या.

जालन्याच्या प्रगतीसाठी कटिबद्ध
——-
जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रगतीसाठी तसेच शासनाच्या सर्व योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या शासकीय योजनांची माहिती देत पुढील महिन्यात होत असलेल्या दहावी व बारावीच्या परिक्षार्थींना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

359 कोटीच्या आराखड्यास मंजूरी
—–
पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत
सन 2026-27 यावर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या 359 कोटी 24 लाखांच्या प्रारूप आराखडया मंजुरी देण्यात आली. सन 2025-26 च्या मंजूर आराखड्यातील 100 टक्के निधी खर्च करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
शासनाने घातलेली मर्यादा व प्रत्यक्ष मागणी यावरून जिल्ह्याचा 2026-27 चा नियोजनाचा आराखडा ठरणार आहे. या आराखड्यामध्ये जिल्ह्यातील यंत्रणेने प्रस्तावित केलेल्या मागणीप्रमाणे निधी मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीला यावेळी खासदार कल्याण काळे, आमदार सर्वश्री राजेश राठोड, अर्जुन खोतकर, बबनराव लोणीकर, नारायण कुचे, संतोष दानवे, हिकमत उढाण, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
••••

Back to top button