बीड

अंकनाद पाढे सात्मीकरण स्पर्धेत स्वरा अडसूळ राज्यात प्रथम

अंकनाद पाढे सात्मीकरण स्पर्धेत स्वरा अडसूळ राज्यात प्रथम

(शिऊर शाळेची स्वरा व शिक्षक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव)

जामखेड प्रतिनिधी;-मॅप एपिक कम्युनिकेशन प्रा.लि.आणि राज्य मराठी विकास संस्था महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकमान्य टिळक अंकनाद पाढे सात्मीकरण राष्ट्रीय स्पर्धेत जामखेड तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा शिऊर या शाळेची इ,तिसरीची कु.स्वरा भरत अडसूळ या विद्यार्थीनीने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.तसेच श्रेयस सुनिल तनपुरे इ. तिसरी याने उत्तेजनार्थ क्रमांक घेऊन बक्षिस पटकावले आहे.

शालेय अभ्यासक्रमात व व्यवहारिक जीवनात गणित या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.या विषयातील पाढे पाठांतर हा महत्त्वपूर्ण भाग आहे.यासाठी स्वराच्या शिक्षिका शिकाऊ प्रशिणार्थी श्रीम.ज्योत्सना नारायण शिंदे (राजगिरवाड) यांनी पाढे पाठांतराचे महत्त्व लक्षात घेऊन स्वराची नावनोंदणी केली.सातत्याने सराव घेऊन योग्य पद्धतीने पाढे सात्मीकरणाचे तंञ विद्यार्थ्यांमध्ये विकसित केले.महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंञी युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत जि.प.प्रा.शाळा शिऊर ता.जामखेड येथे ज्योत्सना नारायण शिंदे या शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून कार्य करीत आहेत.त्यांनी अल्पवधीतच शाळेत अनेक उपक्रम राबवले आहेत.स्वराच्या या पाढे सात्मीकरणाचे व तीच्या मार्गदर्शक शिक्षकांचे सर्वञ कौतुक होत आहे.
गटविकास अधिकारी शुभम जाधव,गटशिक्षणाधिकारी विजय शेवाळे,शिक्षणविस्तार अधिकारी संजय नरवडे,केंद्रप्रमुख सुरेश मोहिते,सरपंच गिरीजा उतेकर,उपसरपंच आजिनाथ निकम,.एस.एम.सी. अध्यक्ष राजाभाऊ तनपुरे,उपाध्यक्ष सुनील तनपुरे, ग्रेड मुख्याध्यापक संतोष वांडरे यांनी स्वराचे व शिक्षिका शिकाऊ प्रशिणार्थी जोस्ना शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.
जि.प.प्रा.शाळा शिऊर ही उपक्रमशील शाळा असून मुख्याध्याध्यापक संतोष वांडरे यांच्यासह आदर्श शिक्षक हनुमंत निंबाळकर,तेजस्विनी मासाळकर,आशा माने,निर्मला काळे ,नामदेव गर्जे,स्मिता सोनवणे व शिकाऊ प्रशिक्षणार्थी ज्योत्सना नारायण शिंदे हे शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात.

Back to top button