महाराष्ट्र

राज कुंद्रा प्रकरणात शर्लिन चोप्राची थेट मुख्यमंत्र्यांना साद

 

मुंबई | पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा वादग्रस्त पती ‘राज कुंद्रा’चे नाव आल्यामुळे एक खळबळ उडाली होती. तसेच त्याला पोलिसांनी अटक करून जेलमध्ये पाठवले होते. या प्रकरणामुळे प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री ‘शर्लिन चोप्रा’ सतत त्याच्यावर आणि शिल्पा शेट्टीवर आरोप करत आहे.

आता शर्लिन चोप्राने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. एवढं नाहीतर तिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मदतीची मागणी केली आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ सुद्धा शर्लिन चोप्राने ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये तिने राज्य सरकारकडे मदत मागितली आहे/

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई पोलिसांना विनंती करताना दिसते आहे. ‘माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री पाटीलजी, पोलिस आयुक्त, मुंबई, नगराळे जी, कृपया मला मदत करा.. माझा जबाब लवकरात लवकर नोंदवण्यात यावा जेणेकरून सत्य बाहेर येईल.’ असं ती म्हणते.

Back to top button