जामखेड शहरातील अतिक्रमण हटवण्याचा निर्धार – प्रशासनाची संयुक्त कारवाई

जामखेड शहरातील अतिक्रमण हटवण्याचा निर्धार – प्रशासनाची संयुक्त कारवाई
जामखेड प्रतिनिधी | दि. १९ मार्चजामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम आता वेग घेणार असून, शहरातील पक्क्या अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा पडणार आहे. आगामी आठ दिवसांत ही कारवाई सुरू होणार असल्याचे तहसीलदार गणेश माळी यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात आज (दि. १९ मार्च) जामखेड तहसील कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीस तहसीलदार गणेश माळी, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता विलास शेवाळे, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता विलास शेवाळे,उप अभियंता लोमाजी घटमल,मुख्याधिकारी अजय साळवे, भूमी अभिलेख कार्यालय चे उप अभियंता विजय लांगोरे,पोलीस निरीक्षक महेश पाटील, ठेकेदार प्रतिनिधी विठ्ठल गांगुली, भाजपा जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, शहराध्यक्ष पवन राळेभात, काँग्रेस चे नेते राहुल उगले, मंगेश बेदमुथ्था, पांडुरंग माने, व्यापारी श्रीकांत ढाळे, धनंजय ढाळे,शिवकुमार डोंगरे, तुषार बोथरा यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक व व्यापारी उपस्थित होते.
*२५ मार्चपासून मोजणी करून अतिक्रमण हटवणार*
शहरातील खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटलपर्यंतची पक्की अतिक्रमणे २५ मार्चपासून हटवण्याचा निर्णय झाला आहे. यासाठी भुमिअभिलेख कार्यालय, जामखेड नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त पथकाकडून मोजणी आणि खूणांकन केले जाणार आहे.
अतिक्रमण हटवल्यानंतर संबंधित विभागाच्या वतीने रीतसर मोजणी करून अतिक्रमण हटवण्यात येणार आहे.
तातडीने भूमिगत गटार आणि पाणीपुरवठा पाइपलाइनचे काम सुरू केले जाईल, असे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी सांगितले.
*ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार*
जामखेड ते सौताडा या महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात झाले असून, नागरिकांनी याविरोधात तक्रारी केल्या आहेत. याबाबत चौकशी सुरू असून, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती तहसीलदार गणेश माळी यांनी दिली.
या कारवाईमुळे शहरातील वाहतूक सुधारण्यास मदत होईल, तसेच नागरिकांना महामार्गाच्या कामाचा लाभ लवकर मिळेल, अशी अपेक्षा आहे.



