बीड

शिवसंग्राम जिल्हा कार्यकारिणी बरखास्त. शिवसंग्रामच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी प्रा.सुभाष जाधव सर यांची निवड जाहीर.

शिवसंग्राम जिल्हा कार्यकारिणी बरखास्त.
शिवसंग्रामच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी प्रा.सुभाष जाधव सर यांची निवड जाहीर.
 अनिल घुमरे जिल्हा सरचिटणीस, पंडित माने बीड तालुकाध्यक्ष, सुहास पाटील बीड शहराध्यक्ष व दिनकर शेळके बीड तालुका उपाध्यक्ष यांच्या निवडीही जाहीर..
 बीड.(प्रतिनिधी)- शिवसंग्राम संघटनेची बीड जिल्हा कार्यकारीणी बैठक शिवसंग्राम भवन बीड येथे शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ.ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश उपाध्यक्ष श्री. प्रभाकर अप्पा कोलांगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, दि. 30 जानेवारी रोजी संपन्न झाली.येत्या काळात येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था व बीड नगर पालिका निवडणूक अनुषंगाने तसेच पक्षबांधणी विस्तार अनुषंगाने जिह्वा कार्यकारिणी बरखास्त करून काल शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ.ज्योतीताई मेटे यांनी नूतन जिल्हाध्यक्षपदी प्रा.सुभाष जाधव सर, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, बीड तालुकाध्यक्ष पंडित  माने, बीड तालुका उपाध्यक्षपदी दिनकर शेळके व बीड शहराध्यक्षपदी सुहास पाटील यांच्या निवडी जाहीर केल्या.उर्वरित निवडी यथावकाश जाहीर करण्यात येतील असे यावेळी सांगण्यात आले.
   याप्रसंगी जिल्ह्यातील उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना डॉ.  ज्योतीताई मेटे यांनी सांगितले की,आगामी काळात झोकून काम करण्याची तयारी नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठेवा .प्रत्येकाने जबाबदारी ओळखून जबाबदारीने काम करावे.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांकडून 100% कामाची अपेक्षा आहे.नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका समोर ठेवून या निवडी  करण्यात आलेले आहेत. शिवसंग्राम अंतर्गत आगामी काळात नवीन आघाडी तयार केल्या जातील. ग्रामीण व शहरी भागात जास्तीत जास्त कार्य करावे. येत्या काळात जास्तीत जास्त पदाधिकारी कार्यकर्त्यांचे  जाळे बीड जिल्ह्यात करावयाचे आहे. पक्षाची शिस्त पाळा.पक्षामध्ये एक कुटुंब म्हणून वागा. तरुणांनी बदल करायची हिंमत दाखवली पाहिजे सकारात्मकता, आक्रमकपणा कार्यकर्त्याने अंगी बनवावा. सदैव हिरोच्या भूमिकेत रहा,आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती संपूर्ण जागा स्वहिमतीवर लढायच्या आहेत मराठा आरक्षण, अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांचे स्मारक,शेतकऱ्यांना निवृत्ती वेतन देण्याकरिता यापुढील वाटचाल करायचे आहे. सोशल मीडियावर सतर्क रहा,शिवसंग्रामचा झेंडा डौलाने फडकवत दिलेल्या जबाबदारीला जागा, संघटनेला व स्वतःला मोठे करा अशा स्पष्ट शब्दांत उपस्थित कार्यकर्त्यांना शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ.ज्योतीताई मेटे यांनी मार्गदर्शन केले.
Back to top button