बीड
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारार्थ रणवीर पंडित उतरले मैदानात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारार्थ
रणवीर पंडित उतरले मैदानात
सौ.शितलताई दाभाडे यांच्यासह सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे केले आवाहन
गेवराई, दि.२४ (प्रतिनिधी) ः- गेवराई नगर परिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार यांच्यासह नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ युवा नेते रणवीर पंडित मैदानात उतरले असून त्यांनी गेवराई शहरातील विविध प्रभागात प्रचार रॅली काढून मतदारांशी संवाद साधला. गेवराई शहराच्या सर्वांगिन विकासासाठी आणि जनतेला मुलभूत सेवा मिळवून देण्यासाठी नगर परिषदेत परिवर्तन घडवून आणि आणि घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांशी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.शितलताई महेश दाभाडे व प्रभाग क्र. १ मधील उमेदवार सौ. गंगासागर विठ्ठल पवार व भास्कर भिकाजी काकडे यांच्या प्रचारार्थ युवा नेते रणवीर पंडित यांनी प्रचार रॅली काढून मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्याहस्ते प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उमेदवारांसह समाधान मस्के, अक्षय पवार, जयसिंग माने, मेघराज शिंदे, अनिल गव्हाणे, योगेश पाटील, संग्राम पंडित, अमर शिंदे, नितीन पोपळघट, बाबुराव बेदरे, राहुल काकडे, ओम काकडे, पप्पू चोरमले, किरण ढवारे, रवि पवार, राम बेद्रे, स्वप्निल मस्के, इमरान अन्सारी, बाबा शेख, गोविंद बेद्रे, अमित वैद्य, बाळू खंडागळे, सोनू पांडे, विष्णू वादे, दादासाहेब चौधरी, सलीम शेख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना रणवीर पंडित पुढे म्हणाले की, आता काळ बदलला आहे, आजचा तरुण सक्रीय होऊन व्यक्त होत आहे. युवकांना विकासाचे व भावनिक राजकरणातील बदल समजतो आहे. युवक शहराच्या विकासासाठी आग्रही असून या उद्देशाने शिवछत्र परिवार विकासाचे व्हिजन घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहे. युवकांनी विरोधकांच्या भुलथापांना भावनिक आवाहनांना भिक न घालता निर्भयपणे राष्ट्रवादीच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहावे. घड्याळाची गतीच आपल्याला विकासाकडे घेऊन जाणारी आहे, युवकांनी हा विचार मतदारांपर्यंत घेऊन जावा, माजी आमदार अमरसिंह पंडित आणि आ. विजयसिंह पंडित यांनी विकासाचा जो आराखडा तयार केलेला आहे. तो मतदारापर्यंत घेऊन जावा आणि नगर परिषदेच्या माध्यमातून गेवराई शहराचा कायापालट करण्यासाठी घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.शितलताई दाभाडे यांच्यासह सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करण्याचे त्यांनी आवाहन केले.
![]()



