संपादकीय

“तात्काळ निलंबन करा, संविधान दिनी तरी.”, चित्रा वाघ यांची मागणी

 

वसई ग्रामीण भागातील आदिवासी महिलांना पोलिसांनी चोर समजून पोलिसांनी मारहाण केली होती. या पोलिसांवर अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही.
तर महिलांना कोणतीही मारहाण केली नसून केवळ समज देण्यासाठी आम्ही त्यांना ताब्यात घेतलं होतं. असं पोलिसांनी सांगितल होत. आता या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट करून या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे, वसईत पोलिसांनी चोर समजून 6 आदिवासी महिलांना बेदम मारहाण केलीय, असं म्हणून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय, पोलिस यंत्रणाची, महाविकास आघाडी सरकारची हीच खरी वृत्ती आहे. इंग्रजांच्या जुल्मी राजवटी सारखी,’ अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

पुढे त्यांनी ट्विटमधून महाविकास आघाडी सरकारला सुनावलं आहे, ‘पोलिसाचं तात्काळ निलंबन करावं आणि संविधान दिनी तरी राज्य भीमाच्या कायद्यान चालतंय हे दाखवून द्यावं,’ असा घणाघात त्यांनी ट्विटमधून केला आहे. वसई येथे विनाकारण महिलांना मारणाऱ्या पोलिसांवर आदिवासी लोकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

Back to top button