बीड

श्री शिवाजीराव पंडीत  महाविद्यालयात महापरीनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

श्री शिवाजीराव पंडीत  महाविद्यालयात महापरीनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
 प्रतिनिधी गढी – जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजीराव पंडित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर, गढी येथे  राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने   महापरिनिर्वाण दिनानिमीत्त अभिवादन  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कला व विज्ञान महाविद्यालय पाटोदा येथील प्राचार्य  डॉ.सदाशिव सरकटे व कार्यक्रमाचे  अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास कदम यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. जयराम ढवळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ. संतोषकुमार यशवंतकर,अविष्कार समन्वयक प्रा. डॉ. धर्मराज कटके,प्रा. डॉ. तबस्सूम इनामदार,प्रा. डॉ. अयोध्या पवळ, प्रा. डॉ. हिरा पोटकुले,प्रा. शिल्पा ससाणे,
 प्रा डॉ.रामहरी फाटक ,प्रा.डॉ.शिवलाल घुगे  प्रा.डॉ.रामदास खताळ,,प्रा.डॉ.बाळासाहेब सरपते, ग्रंथापाल  डॉ.महारुद्र गव्हाणे ,यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक   उपस्थित होते.
Back to top button