📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

कन्या विद्यालयात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा

कन्या विद्यालयात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा

जामखेड प्रतिनिधी: शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय जामखेड येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.

या निमित्ताने विद्यालयाचे ग्रंथपाल मच्छिंद्र श्रीरामे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. मुख्याध्यापिका रोहिणी भोर आणि पर्यवेक्षक संजय हजारे यांच्या शुभहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

प्रदर्शनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नागेश विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री नाळे, पर्यवेक्षक श्री जाधवर आणि अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या ग्रंथ प्रदर्शनात सुमारे ४,००० पुस्तके ठेवण्यात आली होती, ज्याचा लाभ इयत्ता पाचवी ते दहावीतील सुमारे १२३ विद्यार्थिनींनी घेतला.

“वाचाल तर वाचाल” या संदेशातून विद्यार्थिनींना वाचनाचे महत्त्व समजावे, या उद्देशाने हे प्रदर्शन यशस्वी झाले. यश मिळविण्यासाठी विद्यालयातील जेष्ठ शिक्षक सुग्रीव ठाकरे, अशोक घोडके, नानासाहेब मोळवणे, मोहन यादव, नागरे सर, पवार सर, नामदेव सरकुंडे, शंभू देव बडे तसेच कोल्हे मॅडम, नवले मॅडम, पवार मॅडम व पाटोळे मॅडम आदींचे विशेष सहकार्य लाभले.

Back to top button