बीड
अवैध दारू हातभट्टीवर कारवाई; मोहाडी पोलिसांनी ५६,८३०/- रु. चा मुद्देमाल जप्त

अवैध दारू हातभट्टीवर कारवाई; मोहाडी पोलिसांनी ५६,८३०/- रु. चा मुद्देमाल जप्त
दै सूर्योदय:- भंडारा:- पोलीस स्टेशन मोहाडीच्या पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोहाडी हद्दीत अवैध हातभट्टीवर कारवाई केली. आरोपी . ललिता वामन तुमसरे (वय ४५, रा. चारगाव, ता. तुमसर, जि. भंडारा) यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आला.
, मोहाडी पोलिसांनी मोहाजत चौकशीदरम्यान चारगाव शिवारातील वैनगंगा नदिपात्राच्या पाळीवर रेड केली, जिथून ८ प्लास्टिक चुंगळीत अंदाजे २८० किलो सडवा मोहापास (प्रत्येकी ३५ किलो, किंमत २०० रु./किलो) जप्त करण्यात आले. याशिवाय एक लोखंडी ड्रम (किंमत ५०० रु.), ३ टिनचे पिपे (किंमत ३० रु.) व लाकडी जलाउ काड्या अंदाजे 30 किलो (किंमत ३०० रु.) जप्त केल्या गेल्या. एकूण मुद्देमालाची किंमत ५६,८३०/- रु. इतकी आहे.
सदर प्रकरणी कायमी अप. क्र. २३२/२०२५ कलम ६५ (फ) म.दा.का. नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. बेलखेडे, पो.हवा. भुरे, पो.स्टे. मोहाडी यांनी केली. पुढील तपास पोलीस स्टेशन मोहाडीचे अधिकारी करीत आहेत.



