बीड
पोहरागडावरील राष्ट्रीय बंजारा जनजागृती मेळाव्याच्या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हा

पोहरागडावरील राष्ट्रीय बंजारा जनजागृती
मेळाव्याच्या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हा
: बंजारा व्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष
रविकांत राठोड यांचे आवाहन
वाशिम : समस्त बंजारा समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या पोहरागड येथे होणाऱ्या अखिल भारतीय बंजारा जनजागृती मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांतभाऊ राठोड यांनी केले आहे.
बुधवार, २५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता बंजारा ब्रिगेडच्यावतीने बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांतभाऊ राठोड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बाबनलाल महाराज मैदान, पोहरागड, जि. वाशिम येथे अखिल भारतीय स्तरावरील बंजारा जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला समाजभूषण, महंत कबीरदास महाराज, आमदार धर्मगुरू बाबूसिंग महाराज राठोड यांच्यासह अनेक संत, नेते मेळाव्याला उपस्थित राहून अखिल भारतीय बंजारा जनजागृती मेळाव्याला उपस्थित राहुन समस्थ बंजारा समाजाला संबोधित करणार आहेत. या मेळाव्याला महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून लाखोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड यांनी दिली.
…………….
इतिहासात पहिल्यांदाच पोहरागडावर हेलिकॉप्टरने होणार पुष्पवृष्ठी
बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड
यांच्या पुढाकारातून इतिहासात पहिल्यांदाच
गुरुवार, २६ मार्च रोजी सकाळी ९ वाजता आई जगदंबा देवी मंदीर, संत सेवालाल महाराज मंदिर, संत बामनलाल महाराज मंदिर, संत रामराव महाराज समाधी व उमरीगड येथील संत जेतालाल महाराज मंदिर व सामकी माता मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे, अशी माहिती समाजाचे नेते रविकांत राठोड यांनी दिली.



