न्यू इंग्लिश स्कूल राजुरीत एच्.यु. गुगळे चॅरिटेबल ट्रस्ट; चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न

न्यू इंग्लिश स्कूल राजुरीत एच्.यु. गुगळे चॅरिटेबल ट्रस्ट; चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न
जामखेड | प्रतिनिधी :दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल राजुरी विद्यालयामध्ये एच्.यु.गुगळे चॅरिटेबल ट्रस्ट जामखेड आयोजित भव्य चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने एच्.यु.गुगळे ट्रस्ट चे अध्यक्ष, प्रसिद्ध उद्योजक तसेच दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी संस्थेचे माजी सहसचिव रमेश गुगळे हे गेल्या २१ वर्षांपासून संस्थेच्या चारही शाखेत तसेच विद्यालयामध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करत असतात. चित्रकला म्हणजे रंग,रेषा,आकार आणि पोत वापरून सपाट पृष्ठभागावर कल्पना,भावना आणि दृश्ये व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे. जी प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. आणि ती वैयक्तिक अभिव्यक्ती,मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी तसेच ती फायदेशीर छंद म्हणूनही ओळखले जाते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा विद्यार्थ्यांनी एक तरी छंद जोपासावा या हेतूने संस्थेच्या सर्व शाखेमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले जाते. रमेश गुगळे हे नेहमी विद्यार्थी व शिक्षकांचे हित जोपासत असतात. संस्थेतील सर्व शाखेतील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना रमेश गुगळे यांचे नेहमीच मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे या चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. निसर्गरम्य वातावरणामध्ये विद्यार्थ्यांनी चित्र रंगवण्याचा आनंद घेतला. चित्र रंगवताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. यावेळी बोलताना विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना चित्रामध्ये योग्य रंग भरवा म्हणजे आपले आयुष्य ही रंगाने भरले जाईल. चित्र फक्त रेखाटायचे नाही तर त्या चित्रांमध्ये जिवंतपणा असला पाहिजे. योग्य रंग आकार चित्रशैली याचा वापर करून चांगली चित्र निर्मिती झाली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणती ना कोणत एक कला असते आणि आपण त्या कलेचा विकास केला पाहिजे असे मार्गदर्शन केले.
ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड,राजेंद्र पवार,श्रीमती सुनिता पिसाळ, सुभाष बोराटे, जुबेर सय्यद, विजय क्षीरसागर, अक्षय मोहिते, शशिकांत सदाफुले, अनिकेत चौभारे, उमराव लटपटे, हनुमंत राऊत व विद्यार्थी आदींनी विशेष सहकार्य केले.संस्थेच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त विद्यालयांमध्ये वेगवेगळे उपक्रमही घेतले जात आहेत.



