बीड
सलीम बागवान यांना मातृशोक मन्नाबी महमंदनूर बागवान यांचे निधन

सलीम बागवान यांना मातृशोक
मन्नाबी महमंदनूर बागवान यांचे निधन
जामखेड प्रतिनिधी :भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा हज कमेटी ऑफ इंडियाचे माजी संचालक सलीम भाई महमंदनूर बागवान यांच्या मातोश्री मन्नाबी महमंदनूर बागवान यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने बागवान कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मन्नाबी बागवान या मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या जाण्याने कुटुंबीयांसह नातेवाईक व परिचितांमध्ये दुःखाचे वातावरण आहे.
त्यांच्या पश्चात गुलाब व सलीम अशी दोन मुले, दोन मुली, सुना तसेच १० नातवंडे असा मोठा परिवार आहे. विविध राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी बागवान कुटुंबीयांना भेट देऊन सांत्वन केले असून, दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.



