बीड

तंत्रज्ञानाच्या युगात विज्ञान आणि संस्कारांची सांगड आवश्यक – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

तंत्रज्ञानाच्या युगात विज्ञान आणि संस्कारांची सांगड आवश्यक – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड दि. 28 (प्रतिनिधी)ः- आजचा काळ हा सोशल मिडीया आणि इंटरनेटकडे आकर्षित होणारा आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान खुप वेगाने प्रगती करत आहे. या यंत्र युगात विद्यार्थ्यांची शिकण्याची आणि विचार करण्याची पध्दतही बदलली आहे अशा काळात ज्ञानाच्या जोडीला संस्कार देणे अत्यंत महत्वाचे असते.  तंत्रज्ञानाच्या युगात विज्ञान आणि संस्काराची सांगड आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
गिता कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुरेश पेशकार हे 33 वर्षांच्या प्रतिर्घ सेवेनंतर निवृत्त होत असल्याने त्यांचा शाळेच्या वतीने सेवा गौरव सन्मान सोहळा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आदर्श शिक्षण संस्थेचे सचिव माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, अरूण डाके, अ‍ॅड. शेख शफिक, सखाराम मस्के, डॉ.राजा मचाले, योगेश पवार, मुरलीधर राऊत, मनोज पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, विज्ञान आणि शिक्षण हे आपल्या शिस्त शिकवते परंतू त्याचवेळी माणूकी जपणे आणि ती टिकवून ठेवणे आजची सर्वात मोठी गरज आहे. जवळपास 33 वर्षापेक्षा अधिक काळ विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी सातत्याने काम करणार्‍या मुख्याध्यापक पेशकार सरांचा हा सेवानिवृत्ती आणि सेवा गौरव समारंभ अत्यंत भावूक आणि तितकाच अभिमानास्पद आहे. पेशकार सर आज प्रशासकिय नियमानुसार जरी सेवा निवृत्त झाले असले तरी ते आपल्या कार्यातून आणि विचारातून कधीही थकणार नाहीत. या संस्थेच्या उभारणीत आणि प्रगतीत त्यांचे योगदान मोलाचे असून बीड सारख्या गृामिण आणि दुष्काळी शहरात केवळ मुलींच्या शिक्षणासाठी गिता कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुरू करण्यात आले. येथे केवळ शाळा चालवली गेली नाही तर मुलींचे भविष्य अत्यंत कौशल्याने घडविण्याचे पवित्र कार्य केले गेले. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी लावलेले स्त्री शिक्षणाचे रोपटे आणि त्यांनी दिलेली प्रेरणा मनात ठेवून स्व. काकूंनी देखील आदर्श आणि नवगण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुलींसाठी स्वतंत्र व सुरक्षीत शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून दिली याचेच फलित म्हणून आज या संस्थेचे हजारो विद्यार्थी उच्च पदस्थ अधिकारी म्हणून देशात सेवा बजावत आहेत. राजकिय क्षेत्रात काम करत असतानाही शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक चळवळ नियमित अविरत आणि पवित्र ठेवली आहे. राजकारण बाजूला ठेवून शिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना प्रवहात आणने हेच आमचे नेहमी ध्येय राहिले आहे.  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत पेशकार सरांनी देश प्रेम, निष्ठा आणि समाजसेवेचे जे उत्तम उदाहरण घालून दिले आहे ते कौतुकास्पद आहे असे त्यांनी सांगितले. या शिवाय वडवरकर ऋतुजा, डॉ.चेतना पेशकार, श्रीमती सुनिता पेशकार, सुरेश पेशकार, अ‍ॅड.शेख शफिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी अरूण बोंगाणे, अर्जुन बहीरवाळ, आण्णासाहेब थिटे, प्रशांत पौळ, सुनिल शिंदे, अंगद दहिफळे,  गणेश परदेशी, सुधाकर तांदळे, व्ही.आर. शिंदे, महादेव कसबे, सौरभ पेशकार, सारंग जोशी, श्रीकांत कुलकर्णी, विजय देवमाने यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, महिला, पुरूषांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती देशमुख यांनी तर सुत्र संचालन प्रा. श्रीराम जाधव यांनी केले. शेवटी दादासाहेब गवते यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Back to top button