बीड

ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वृक्ष लागवड पंधवरवडा मोहिमेचा थाटात शुभारंभ

ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वृक्ष लागवड पंधवरवडा मोहिमेचा थाटात शुभारंभ

२६ जुलैपर्यंत शहरात मोठ्या प्रमाणात होणार वृक्षारोपण ; अभिनव उपक्रमांचे नागरिकांनी केले कौतुक

परळी वैजनाथ।दिनांक ११।:-राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने आयोजित वृक्ष लागवड पंधरवडा मोहिमेचा आज थाटात शुभारंभ झाला. आजपासून येत्या २६ जुलैपर्यंत शहराच्या विविध भागात मोठया प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. दरम्यान या अभिनव उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले आहे.

शहरातील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी वृक्षारोपण करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या आवाहनानुसार त्यांच्या २६ जूलै रोजी येत असलेल्या वाढदिवसाच्या अनुषंगाने भाजपतर्फे हा वृक्ष लागवड पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. ना. पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने विविध जातींच्या वृक्षांची रोपे यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आजपासून ते थेट २६ जूलै पर्यंत शहरातील विविध ठिकाणी सरकारी व खासगी जागेवर या मोहिमेतंर्गत वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

आज झालेल्या या कार्यक्रमास भाजपच्या शहराध्यक्षा सौ. उमाताई समशेट्टे, लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय देशमुख,सचिव रवींद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख, प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे, ग्रामीण मंडल अध्यक्ष राजेश गित्ते, दीनदयाळ बॅकेचे राजेश्वर देशमुख,राजेंद्र ओझा, महादेव इटके,सुचिताताई पोखरकर,ज्ञानोबा सुरवसे,अच्युत जोगदंड,अरुण पाठक,अश्विन मोगरकर,प्रशांत कराड,बंडू नाना कोरे,अनिश अग्रवाल,अनिश शेख
श्रीपाद शिंदे,दिलीप नेहरकर,
जितेंद्र मस्के,सुशील हरंगुळे,
रवींद्र देशमुख,श्रीनिवास राऊत
राजेंद्र लोढा,सुदर्शन वाडकर,
प्रा पंढरीनाथ गुट्टे, प्रा शाम नेरकर, प्रा अशोक पवार, प्रा प्रविण नव्हाडे आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे
सुत्रसंचलन प्रा प्रविण फुटके यांनी केले तर अश्विन मोगरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Back to top button