बीड
महागाईवर मात करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन.

महागाईवर मात करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन.
शासकीय कर्मचारी, व्यापारी, उद्योजक व शेतकरी बांधवांसाठी सुवर्णसंधी
बीड प्रतिनिधी – आजच्या बदलत्या आर्थिक परिस्थितीत केवळ पैसा कमावणे पुरेसे नसून तो योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने गुंतवणेही तितकेच महत्त्वाचे बनले आहे. वाढती महागाई, भविष्यातील गरजा, मुलांचे शिक्षण, निवृत्तीचे नियोजन आणि आर्थिक सुरक्षितता या सर्व बाबी लक्षात घेता योग्य गुंतवणूक हा प्रत्येकासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर बदलत्या काळाची गुंतवणूक –
म्युच्युअल फंड मार्गदर्शन सेमिनार चे आयोजन करण्यात आले आहे.
हा मार्गदर्शन सेमिनार मंगळवार दिनांक 19 मे रोजी सायंकाळी 6 वाजता बीड रोडवरील हॉटेल कन्हैया इन येथे आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमामध्ये म्युच्युअल फंड क्षेत्रातील अनुभवी तज्ञ नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. या सेमिनारमध्ये श्री वैभव सोनवणे साहेब (क्लस्टर मॅनेजर, UTI म्युच्युअल फंड) हे म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे प्रकार, दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे, SIP चे महत्त्व, जोखीम व्यवस्थापन तसेच आर्थिक नियोजन याविषयी माहिती देणार आहेत. तसेच श्री रोहित धाट सर (NJ ब्रांच मॅनेजर, बीड) हे बदलत्या काळात सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणुकीसाठी कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत यावर मार्गदर्शन करणार आहेत.
सामान्य नागरिकांमध्ये अजूनही म्युच्युअल फंड गुंतवणुकीबाबत अनेक गैरसमज व भीती असल्याचे दिसून येते. म्युच्युअल फंड म्हणजे केवळ मोठ्या लोकांची गुंतवणूक किंवा यामध्ये खूप जोखीम असते अशा समजुती दूर करून योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या सेमिनारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. कमी रकमेपासून सुरू होणारी SIP, दीर्घकालीन परतावा, कर बचत आणि आर्थिक स्वावलंबन यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन मिळणार आहे. बालाघाट परिसरातील सर्व शासकीय कर्मचारी, शिक्षक, व्यापारी, उद्योजक, डॉक्टर, वकील, शेतकरी बांधव, पत्रकार बांधव तसेच युवकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून आर्थिक नियोजन व योग्य गुंतवणुकीचे ज्ञान मिळवावे, असे आवाहन आयोजक श्री नामदेव घोडके सर (आर्थिक सल्लागार) यांनी केले आहे.



