देशविदेशबीडशेतीविषयक

खेळ मांडला !! सरकार आणि निसर्गाच्या कचाट्यात भरडला जातोय शेतकरी ?

विशेष रिपोर्ट ।। ओम बडे

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे गेल्या पंधरा दिवसांपासून निसर्ग राजा शेतकऱ्यांवर कोपला असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे , जो मराठवाडा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जायचा त्या ठिकाणची सर्व धरणे अतिवृष्टी मुळे फुल झाली आहेत नद्या ओढ्याना महापूर आलेला आहे, शेतकरी राजाच्या शेतात तळ्याचे स्वरूप निर्माण झाले आहे जमीन खरवडून गेली आहे सुपीक जमीन नापीक झाली आहे शेतातील जागा पिकांच्या ऐवजी दगड गोट्यानी घेतली आहे गेल्या तीस चाळीस वर्षात जेवढा पाऊस झाला नाही, तेवढा अति पाऊस या दहा दिवसात बरसला आणि एका क्षणात होत्याच नव्हतं झालं आणि हातातोंडाशी आलेलं पीक या अतिवृष्टी च्या वादळात नष्ठ झालं आणि आधी आभाळाकडे डोळे लावून पावसाची आतुरतेने वाट पाहणारा शेतकरी आता मान खाली घालुन बसला आहे कारण दिवसरात्र काबाड कष्ट करून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल पीक एका रात्रीत मुसळधार पावसाने हिसकावून घेतलं, नद्यांनी रौद्ररूप धारण केल आणि शेतातील पिकांच्या जागेवर नद्या ओसंडून वाहु लागल्या ,जमीन नापीक झाली.

दुष्काळ पडल्यावर तरी शेतकरी पुढच्या वेळी चांगला पाऊस पडेल या आशेवर बसायचा पण आता जमिनीतील आवश्यक क्षार या दृष्ट चक्रात निघून गेल्याने आतापर्यंत कसलेली जमीन नापीक झाली एकीकडे पावसाचा धुमाकूळ आणि दुसरीकडे मायबाप सरकार नुकसान ग्रस्त शेतकरी यांना तात्काळ मदत देऊन आधार देण्याऐवजी पंचनामे करू, आढावा घेऊ, आणि नंतर मदत करू अशा बढाया मारत आहे आता जमिनीत पिकच राहिलेले नसल्याने पंचनामे तरी कशाचे करणार असा उद्विग्न सवाल शेतकरी करत आहेत. शेतकरी सरकार आणि निसर्ग यांच्या कचाट्यात सापडला, ज्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो त्यालाच या दृष्टचक्राने संपवलं , आता शासनानेच सर्वांना अन्नधान्य पिकउन जगवणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देऊन धीर देण्याची गरज आहे.

या अतिवृष्टी मुळे लोकांची घरे वाहून गेली ,शेतातील अवजारे पाण्यात गेली , तसेच काहींना आपला जीव गमवावा लागला कधीकाळी दुष्काळी असणाऱ्या मराठवाड्यात आता सगळीकडे पाणीच पाणी झाले पण त्या दृष्ट् निसर्गाने शेतकऱ्यांच्या जमिनी आता नद्या बनवल्या. त्यामुळे सरकारने त्वरित निराधार झालेल्या बळीराजा ला शक्य तेवढ्या लवकर भरीव आर्थिक मदत करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी एवढीच माफक अपेक्षा.

Back to top button