संपादकीय

समीर वानखेडे यांची बाजू भक्कम , प्रकाश आंबेडकर यांनी मांडली कायदेशीर बाजू !

 

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या शाळेचा दाखला सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यातून समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचं स्पष्ट होत आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्या जात आणि धर्माच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या गदारोळावर भाष्य केलं आहे.

एखादा मुलगा १८ वर्षाचा झाल्यानंतर त्या मुलाला आई-वडिलांचा धर्म लागू होत नाही. सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात निकाल दिला आहे. त्यामुळे एसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची बाजू भक्कम असून या प्रकरणात त्यांच्याच बाजूने निर्णय येईल, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

वानखेडेंच्या वडिलांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. मी वयात आल्यानंतर वडिलोपार्जित धर्माचाच आहे, असं त्यांनी जाहीर केलं. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पाहता या निर्णयाने वानखेडे बरोबर आहेत. वडिलांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असला तरी वयात आल्यानंतर मी हा धर्म स्वीकारलेला नाही असं वानखेडेंचं म्हणणं असल्याचं आंबेडकर म्हणाले.

कोर्टाच्या निर्णयानुसार १८ वर्षाचा असेपर्यंत कोणताही मुलगा आई-वडिलांच्या ताब्यात असतो. ते त्याचे पालक असतात. पालक म्हणून आईवडिलांनी जे काही केलं ते त्याला लागू होतं असं नाही. त्याला त्याचा धर्म निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणून वानखेडेच्या कास्ट आणि धर्माबाबतचा मुद्दा या निकालात पूर्णपणे कव्हरअप झाला आहे, असं आंबेडकर म्हणाले.

Back to top button