बीड

अवधूत पवार यांच्या उपोषणाला तालुका डॉक्टर्स असोसिएशनचा पाठिंबा

अवधूत पवार यांच्या उपोषणाला तालुका डॉक्टर्स असोसिएशनचा पाठिंबा

जामखेड शहराचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करावा – डाॅक्टर्स असोसिएशन ची मागणी

जामखेड प्रतिनिधी :

जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५४८-डीवरील अतिक्रमण तसेच रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. धूळीचे प्रमाण वाढल्याने ॲलर्जीचा खोकला, सर्दी, दमा, नाकाच्या हाडांची वाढ, श्वसननलिकेचा दाह अशा आजारांचे प्रमाण वाढत असून अपघातांची संख्याही वाढत असल्याचे स्थानिक डॉक्टरांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी अतिक्रमण विषयावर मांडलेल्या मागण्यांच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या उपोषणाला जामखेड तालुका डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने अतिक्रमण हटवून रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत गायकवाड, सचिव डॉ. सादेख पठाण, भरत देवकर, डॉ. सुशिल पन्हाळकर, डॉ. आबेद जमादार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शहाजी राळेभात, नगरसेवक पवन राळेभात, सरपंच काकासाहेब चव्हाण, सचिन शिंदे, संभाजी राळेभात, हनुमंत मोरे आदी उपस्थित होते.

आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात.

Back to top button