बीड
बालेपीर भागातील मूलभूत समस्यांची पाहणी; लवकर निराकरणाचे आश्वासन

बालेपीर भागातील मूलभूत समस्यांची पाहणी; लवकर निराकरणाचे आश्वासन
बीड : शहरातील बालेपीर परिसरातील विविध मूलभूत समस्यांच्या अनुषंगाने आज प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, नगराध्यक्ष प्रतिनिधी मुजीब भाई, तसेच स्वच्छता व आरोग्य सभापती निजाम शेख यांच्यासह स्थानिक नगरसेवक राजाभाऊ गुजर, आयुब भाई व खय्युम भाई उपस्थित होते.
पाहणीदरम्यान परिसरातील प्रमुख समस्या असलेल्या रस्ते, लाईट व नाले या बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांनी मांडलेल्या अडचणी लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना आश्वासन दिले की, बालेपीर भागातील सर्व प्रश्न प्राधान्याने हाताळून लवकरात लवकर सोडविण्यात येतील.
याप्रसंगी जमील खान, अकबर खान, इरफान शेख, युसुफ भाई, सोहेल खान, अवेज खान, सुजन खान, अन्वर भाई, खलील भाई यांच्यासह परिसरातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक नागरिकांनी देखील प्रशासनाकडून तातडीने कामे पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.



