बीड

पिताजी सारडा नगरी मध्ये स्तुत्य उपक्रम.१० वी व १२ वी व स्पर्धा परीक्षा च्या गुणवंत विध्यार्थ्यांनचा सत्कार

पिताजी सारडा नगरी मध्ये स्तुत्य उपक्रम.१० वी व १२ वी व स्पर्धा परीक्षा च्या गुणवंत विध्यार्थ्यांनचा सत्कार

अंबाजोगाई प्रतिनिधी:-पिताजी सारडा नगरी गृहनिर्माण संस्था जोगाईवाडी येथील कर्तव्यदक्ष संचालकमंडळ सतत नवनवीन उपक्रम करत असतात.असाच नवीन संचालकांनी हयावर्षी पासुन नवीन उपक्रम चालु केला तो म्हणजे गुणवंत विध्यार्थ्यांनांचा सत्कार.
तर दि१८/०५/२०२५ वार रविवारी रोजी पिताजी सारडा नगरी गृहनिर्माण संस्थेच्या कार्यालया समोर सायंकाळी ८:००वा गुणवंताचा सत्कार सोहळा संपन्न झाला. या सत्कार समारंभास अध्यक्ष म्हणून लाभलेत पिताजी सारडा नगरीचे तरुण तडफदार व ज्यांच्या मनात सतत नवनवीन विचारांची मालिका चालू असते असे आपल्या सर्वांचे लाडके अध्यक्ष श्री.संतोषजी राख साहेब व या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्या लाभल्या त्या पिताजी सारडा नगरीतील गुट्टे साहेबांच्या कन्या सौ. रोहिणीताई गुट्टे चाणक्य मंडलच्या विश्वस्त आणि शैक्षणिक प्रमुख आहेत. तसेच त्यांच्या बद्दल सांगताना नगरीचे जेष्ट संचालक श्री .विनायक चव्हाण सर यांनी असे सांगितले कि आपल्या नगरीचे भाग्य कि त्या योगायोगाने आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून भेटल्या नाही तर पुण्यात त्यांना भेटण्यासाठी तासनतास वाट पहावी लागते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावित या सोसायटी चे सचिव जे कि सोसायटीत रहिवाशांना नवनवीन सुविधा देण्यात व्यस्त असतात ते मा.श्री सचिन जी कुलकर्णी साहेब यांनी केले.प्रथम सोसायटी चे अध्यक्ष श्री.राख साहेब यांचे स्वागत श्री.कटारे सचिन व श्री.राहुल गित्ते यांनी केले व प्रमुख पाहुणे सौ.रोहिणीताई गुट्टे यांचे स्वागत संचालिका सौ.स्वप्नाली शिराळे मँडम व सविता मगर मँडम यांनी केले व गुट्टे साहेब यांचे स्वागत श्री शिराळे सर यांनी केले.तसेच सोसायटी तील १०वी व१२व स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विध्यार्थ्यांनचे सत्कार करण्यात आले.कु. दिपीका शिवाजी बादाडे सिव्हिल इंजिनिअर MPSC पदी निवड झाल्याबद्दल1) शिवम शेंडे -10वी 2) आदित्य बरडे -10वी 3) सोहम कटारे -10वी
4) शर्वरी गाडेकर -10वी 5) मंगेश चेवले -10वी
6) वेदांत शिंदे -10वी 7) आदित्य काळम पाटील -10वी 8) सिद्धी बंडगर -10वी 9) नंदिनी अंबाड-10वी 10) तेजस भांडवलकर -12वी
11) साक्षी बरडे 12 वी या विद्यार्थ्यांचे शाल श्रीफळ हार व मिठाई बाँक्स देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मार्गदर्शन पर भाषणेही झाली त्या मध्ये सोसायटी मधून जेष्ठ मार्गदर्शन म्हणून श्री बिडगर सर व पालकांन मधुन श्री.सुर्यकांत बंडगर सर व संचालकातुन श्री.नितीन शिराळे सर यांनी विध्यार्थ्यांनां शिक्षणा विषयाचे म्हत्व विध्यार्थ्यांनां उदाहरणे देऊन पटवून सांगितले. तसेच नुकत्याच स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन विद्युत मंडळात लागलेल्या आपल्या सोसायटीतील बादाडे सरांच्या कन्या दिपीका बादाडे यांनी आपले मनोगत व उत्तीर्ण विध्यार्थ्यांनां स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन केले.यानंतर प्रमुख पाहुणे सौ.रोहिणी ताई गुट्टे यांनी प्रथम सोसायटी चे कौतुक केले कि सर्व सोसायटी मध्ये धार्मिक कार्यक्रम केले जातात परंतु हा कार्यक्रम पहिल्यांदाच पहात आहे. विध्यार्थ्यांनांच्या जिवनात आई वडिलांचा किती रोल म्हत्वाचा आहे.व मुलांनी आई वडिलांना साठी व आई वडिलांनी मुलांनसाठी काय केले पाहिजे हे म्हत्व पटवून दिले.त्यांनी असे सांगितले कि चाणक्य मंडलात आम्ही असे समजतो कि ज्या समाजाला शिक्षणाचे म्हत्व समजते तो समाज सर्वात पुढे जातो व अभ्यासा विषयी तिन मित्रांची म्हणजे आपल्या देशाचे राष्ट्रपती शास्त्रज्ञ किंवा मिसाईलमँन श्री आब्दुल कलाम यांच्या विषयी ची गोष्ट सांगितली.व स्पर्धा परीक्षा व करिअर च्या कुठल्याही क्षेत्रात मदत हवी असेल तर कधीही माझ्या कडे या व त्यांनी दहावी नंतर च्या फाऊंडेशन कोर्स विषयी सांगताना त्या अशा म्हणाल्या कि फाऊंडेशन म्हणजे चारित्र्य घडन व विद्यार्थ्यांनचे चारित्र्य घडन जर चांगले झाले तरच ते पुढे स्पर्धेत टिकतात.व त्यानी चाणक्य मंडला च्या फि विषयी सांगितले कि जे विद्यार्थी गरीब व गरजवंत आहे आशा विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो व जेवणाचे पण पैसे दिले जातात असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
हया कार्यक्रमा मध्ये एक बाब विशेष वाटली ति म्हणजे श्री अमित जी वर्मा यांची ते सतत सोसायटीच्या कार्यक्रमात आपल्या कमईतला एक रुपया तरी सोसायटीच्या स्पर्धेत बक्षीस म्हणून लावतात तसेच त्यांनी आज सपना डेअली निड्ड्स.. प्रो.प्रा. अमितजी वर्मा सर यांच्या तर्फे सर्व विदयार्थी यांना मिठाई बॉक्स देण्यात आले.
जेष्ठ संचालक श्री. विनायक चव्हाण सर यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले देशमुख सर, काळम पाटील, इंगळे साहेब, गिराम भैय्या, गुणाले काका, गौड मामा, नायबळ साहेब या नगरीच्या प्रतिष्ठीत व्यक्ती सोसायटीच्या संचालकांना नवनवीन सुविधा तसेच उपक्रम करण्यासाठी सदैव मदतीसाठी तत्पर असतात
तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.विनायक चव्हाण सर यांनी केले व हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी संचालक श्री सचिन कटारे व राहुल गित्ते यांनी व सर्व संचालक मंडळानी खुप मेहनत घेतली व सोसायटी तील सर्व गुणवंत विद्यार्थी पालक व नागरिक उपस्थित होते.

Back to top button