रायगड

शंभूपुत्र श्री.थोरले शाहु महाराज यांचा श्री क्षेत्र गांगवली (माणगाव) ते सातारा पालखी सोहळा २०२५ संपन्न

शंभूपुत्र श्री.थोरले शाहु महाराज यांचा श्री क्षेत्र गांगवली (माणगाव) ते सातारा पालखी सोहळा २०२५ संपन्न

विशेष प्रतिनिधी : नंदकुमार चांदोरकर

हिंदनृपती शंभूपुत्र थोरले शाहू महाराज पालखी सोहळा २०२५. मागील ३ वर्षे श्री क्षेत्र गांगवली ( माणगाव ) ते राजधानी सातारा असा शंभूपुत्र शाहू महाराजांचा पालखी सोहळा समिती महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून काढण्यात येतो.यंदा पालखीचं हे ४ थे वर्ष होते,पालखीची सुरुवात श्री क्षेत्र गांगवली गावातील पाच वाड्यातुन मिरवणूक काढुन मोठ्या उत्साहात शाहू भक्तांकडून स्वागत केले गेले.कार्यक्रमाची सुरुवात श्री वैजनाथ मंदिरातील शंभू देवाला शाहू महाराजांकडून अभिवादन करून होते. या वर्षी कार्यक्रमाला स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांच्या वंशजाची उपस्थिती लाभली. त्यांचा सत्कार महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री शिवभक्त श्री भरत शेट भोगावले यांच्या कन्या शितलताई गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच रायगड भूषण सचिन भोईर व स्वरा भोईर यांचा देखील यावेळी शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम पार पडला,शिव-शंभू शाहू व्याख्याती कु. सायली प्रमोद भोसले पाटील हिने शाहू महाराजांवर प्रथमच पोवाडा गायला व त्यानंतर शाहू महाराजांवर व्याख्यान देखील दिले. शिवभक्त जयकाल शिखरे यांनी रायगडावरचा राज्याभिषेक वर्णन करून सगळ्यांना मंत्रमुग्ध केले व रात्री बारा वाजता शाहू महाराजांचा पाळणा गाऊन शाहू महाराजांच्या जयंतीची सुरुवात करण्यात आली. दि.१८ मे २०२५ रोजी पहाटे शाहू महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालण्यात आला.गांगवली ग्रामस्थ व शाहू महाराज स्मारक समिती अध्यक्ष अतुलदादा तोंडलेकर यांचे आभार मानून पालखी सोहळा साताऱ्याच्या दिशेने मार्गस्थ झाला.
महाड मधील शिवस्मारका जवळ कोकणकडा मित्र मंडळ व सुरेश दादा पवार यांच्या कडून शाहू महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पोलादपूर येथील शिवस्मारकाच्या येथे शिव प्रतिष्ठान हिंदूस्थान व शाहूसेवक श्री. दिपक उतेकर यांच्या वतीने शाहू महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. कापडे बुद्रुक येथे शिव प्रतिष्ठान हिंदूस्थान यांच्या वतीने शाहू महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. कापडे बुद्रुक येथील ईश्वरी ढाब्याचे मालक अण्णा शेठ,प्रसाद साने व राजेश डांगे यांच्याकडून शाहू सेवकांच्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
शंभूपुत्र शाहू महाराजांच्या पालखीचे स्वागत मेढा,सातारा येथे करण्यात आले. त्यानंतर जलमंदिर येथे पालखीचे स्वागत छत्रपती श्री.उदयनराजे महाराज यांनी शाहू महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. व साताऱ्यात ही शाहू महाराजांचे मोठे स्मारक उभे करूया असे आश्वासन दिले. छत्रपती मराठा सेवा समिती चे संस्थापक अध्यक्ष ओमकार दादा देशमुख यांनी भैरवनाथ लेझीम पथक चिंचनेर यांच्या कडून शाहू महाराजांच्या पालखीचे स्वागत करत पालखी शिवतीर्थ पोवई नाका येथे नेण्यात आली ह्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रा.पांडुरंग शिंदे सर ( इतिहास अभ्यासक), शिवशाहीर प्रविण फणसे सर व त्यांचे शाहीरी कुटुंब, यांनी पोवाई नाक्यावरील उपस्थित सर्व शिवशंभू शाहू भक्तांना आपल्या शाहीरी पोवाड्यातून मंत्रमुग्ध करून टाकले, तसेच तरूण भारत साताराचे संपादक दिलीप प्रभावळकर हे देखील कार्यक्रमास उपस्थित होते, त्यानंतर शाहू महाराजांची पालखी संगम माहुली येथील शाहू महाराजांच्या समाधी स्थळाकडे नेण्यात आली आणि तिथे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हिंदनृपति छत्रपती थोरले शाहू महाराज पालखी सोहळ्यास सह्याद्री प्रतिष्ठान मावळ अध्यक्ष सचिन शेडगे व त्यांच्या शाहूसेवकांचे खूप मोठे योगदान दिले. अशी माहिती पालखी सोहळा समितीचे संस्थापक प्रमोद भोसले व अध्यक्ष भरत मोरे यांनी दिली यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलतांना दिली.

Back to top button