बीड
जिल्हाधिकाऱ्यांच्या जनता दरबारात जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्याची दिव्यांग कर्मचारी संघटनेची जिल्हाधिकार्यांकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी.

जिल्हाधिकाऱ्यांच्या जनता दरबारात जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्याची दिव्यांग कर्मचारी संघटनेची जिल्हाधिकार्यांकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी.
बीड जिल्ह्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर निर्माण करण्याकरिता तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीयुत.अविनाश पाठक हे सबसेल अपयशी ठरल्याने त्यांची जिल्हाधिकारी पदावरून जिल्हावासीयांच्या जनतेचा रोष पत्कारून मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाने शासनाच्या अप्पर मुख्य सचिव श्रीमती व्ही.राधा यांच्या आदेशान्वये तडकाफडकी बदली करण्यात आल्याने दि:24/04/2025 रोजी भारतीय प्रशासन सेवेत थेट नियुक्त झालेले कर्तव्यदक्ष व क्रियाशील सनदी अधिकारी म्हणून श्रीयुत विवेक जॉन्सन हे जिल्हाधिकारी पदावर रुजू होताच त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा जिल्हावासीयांच्या मनामध्ये निर्माण केला आहे. श्री जॉन्सन हे जिल्हाधिकारी पदावर रुजू होताच दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी जिल्हावासीयांच्या व दिव्यांग व्यक्तींच्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता आपल्या सनियंत्रणात जिल्हा जनता दरबाराचे आयोजन करावे या स्वरूपाची प्रमुख मागणी त्यांना भारतीय संविधान प्रत सन्मानपूर्वक भेट देऊन केली होती व दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले की, आजतागायत आपल्या पदाचा कार्यभार पाहणाऱ्या यापूर्वीच्या कोणत्याही जिल्हाधिकाऱ्याने जिल्हावासीयांकरीता शासकीय जनता दरबाराचे आयोजन केलेले नाही. म्हणून आठवले यांनी केलेल्या मागणीचा जिल्हाधिकारी महोदयांनी गांभीर्याने विचार करून आपल्या कार्यालयात जनता दरबार आयोजनास प्रारंभ केला. परंतु जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती व दुर्लक्षित समाज घटकांच्या समस्या या प्रामुख्याने जिल्हा परिषद व पोलीस प्रशासन या शासकीय विभागांतर्गत असल्याने या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याकरिता आपल्या समक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद श्रीयुत.आदित्य जिवणे व पोलीस अधीक्षक श्रीयुत.नवनीत कॉवत या प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांना जनता दरबारात जाणीवपूर्वक उपस्थित राहण्याबाबत आदेशीत करावे. जेणेकरून दिव्यांग व्यक्तींना व इतर नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्यांचे गांभीर्यपूर्वक व तात्काळ निराकरण करून त्यांना यथोचित न्याय देणे सुलभ होईल. या प्रांजळ हेतूने अशा प्रमुख अधिकाऱ्यांना जनता दरबारात आपल्या समवेत उपस्थित राहण्यास लेखी आदेश निर्गमित करावेत या स्वरूपाची मागणी जिल्हाधिकारी श्रीयुत विवेक जॉन्सन यांच्याकडे शासनमान्यता प्राप्त दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.



