
मयताची ओळख पटवण्याचे गेवराई पोलिसांची आवाहन
गेवराई प्रतिनिधी -: गेवराई शहराजवळ असलेल्या राष्ट्रीय महामार्ग 52 वर बाप पिंपळगाव फाट्याजवळ पाई जाणाऱ्या पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने सदरील इसमाचा जागीच मृत्यू झाला. सदरील घटना राष्ट्रीय महामार्ग पोलीस यांना समजले असता त्यांनी राष्ट्रीय महामार्ग च्या रुग्णवाहिकेमध्ये गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये त्याला आणले असता येथील उपस्थित डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. सदरील इसमाचे वय अंदाजे 40 असून या इसमाची ओळख अद्याप पटली नसून या इसमाचा मृतदेह गेवराई उपजिल्हा रुग्णालयामध्ये ओळख पटवण्यासाठी ठेवलेला आहे.सदरील इसमास कोणी ओळखत असल्यास खालील क्रमांका वर माहिती द्यावी 9011013505 असे आवाहन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामनाथ उगलमुगले यांच्या सह पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



