बीड

बीड येथे 14 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान मधुमेह रुग्णांची लघवी व रक्त तपासणीची मोफत ..

बीड येथे 14 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान मधुमेह रुग्णांची लघवी  रक्त तपासणीची मोफत ..

 

बीड प्रतिनिधी:

आनंद ऋषीजी हॉस्पिटल, बीड येथे गेल्या कित्येक वर्षांपासून ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर रुग्णसेवा करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 14 नोव्हें बर – जागतिक मधुमेह दिन व्यापकपणे साजरा करण्यात येतो. जगभरामध्ये शंभर कोटींहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. ही गंभीर सामाजिक जाणीव लक्षात घेऊन आनंद ऋषीजी हॉस्पिटल, बीड येथे मोफत मधुमेह तपासणी उपक्रम राबविण्यात आला आहे.

 

31 डिसेंबर 2025 पर्यंत मधुमेह रुग्णांसाठी व ज्यांना मधुमेहाची लक्षणे जाणवत आहेत अशांसाठी खालील तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत:

 

– रक्तातील जेवणाअगोदरची साखर (Fasting Sugar)

– जेवणानंतरची साखर (PP Sugar)

– रँडम शुगर तपासणी

 

अलीकडच्या काळात मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने वेळेवर तपासणी व जीवनशैलीतील बदल केल्यास आजार नियंत्रणात राहू शकतो. अनेक रुग्णांकडून या गोष्टींकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे सामाजिक भान म्हणून हा उपक्रम बीड शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी विशेष राबविण्यात येत आहे.

 

तपासणीसोबत मोफत वैद्यकीय मार्गदर्शन देखील करण्यात येणार असून बीडमधील सुप्रसिद्ध डॉ. राजेश पारिख मार्गदर्शन करणार आहेत.

 

तपासणीची वेळ : दररोज सकाळी 7 ते संध्याकाळी 7

 

हा उपक्रम आनंद ऋषीजी हॉस्पिटल, जालना रोड, शाहू बँकेच्या बाजूला सुरू आहे.

या स्तुत्य उपक्रमाचा लाभ बीड शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त घ्यावा, असे आवाहन सकल जैन समाज, बीड व जैन सोशल फेडरेशन, अहिल्यानगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button