पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त जामखेडमध्ये भव्य रक्तदान शिबिरासह विविध उपक्रमांचे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त जामखेडमध्ये भव्य रक्तदान शिबिरासह विविध उपक्रमांचे आयोजन
जामखेड प्रतिनिधी –देशाचे कणखर नेतृत्व, लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जामखेड शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता भाजपा कार्यालयात पार पडणार आहे.तसेच सेवा पंधरवडा अंतर्गत विविध उपक्रम राबवून होणार वाढदिवस साजरा. असे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
यामध्ये दि.१८ सप्टेंबर रोजी स्वच्छता अभियान, सकाळी ८.०० वाजता श्री नागेश्वर मंदिर, डॉ बाबासाहेब आंबेडकर,सिध्दार्थ नगर,दि.१९ सप्टेंबर रोजी
स्वच्छता अभियान, तपनेश्वर मूळ महादेव मंदिर, तपनेश्वर गल्ली,दि.२० सप्टेंबर रोजी आरोग्य शिबीर , ढवळे किराणा दुकान जवळ, तपनेश्वर रोड,दि.२१ सप्टेंबर रोजी पशुवैद्कीय आरोग्य शिबीर,धोत्री,लेहनेवाडी,भुतवडा,जमादारवाडी,चुंबळी,जांबवाडी,बटेवाडी,दि.२२ सप्टेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता दिव्यांग व्यक्ती सन्मान,भाजपा कार्यालय,जामखेड ,दि.२३ सप्टेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता आरोग्य शिबीर, जामखेड शहर,दि.२५ सप्टेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता पंडित दिनदयाळ जयंती व वृक्षारोपण ओकल फाॅर लोकल(स्वदेशी नारा), बीड रोड,जामखेड पोलीस स्टेशन,दि.२८ सप्टेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता नमो मॅरेथॉन, खर्डा चौक,चौफुला जामखेड,दि.२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.०० वाजता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री
जयंती ,भाजपा कार्यालय, जामखेड असे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
जामखेड शहर मंडल भाजपा तालुका अध्यक्ष संजय (काका) काशिद यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “आपल्या एका थेंब रक्तातून एखाद्या रुग्णाला नवा श्वास मिळू शकतो.मोदींचा वाढदिवस म्हणजे समाजासाठी काम करण्याचा संकल्प आहे,आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवशी या समाजोपयोगी उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान करून समाजासाठी अमूल्य योगदान द्यावे.
नागरिक, कार्यकर्ते, युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा करावा, असे आवाहन संजय (काका) काशिद यांनी केले आहे.



