बीड

रोजगार सेवक संघटनेच्या शिरूर तालुकाध्यक्षपदी सुरेश वारे यांची निवड

रोजगार सेवक संघटनेच्या शिरूर तालुकाध्यक्षपदी सुरेश वारे यांची निवड

अंमळनेर प्रतिनिधी:- दि.११ बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्याची रोजगार सेवक तालुका अध्यक्षाची ८ तारखेला निवड करण्यात आली . या निवड प्रक्रियेमध्ये रोजगार सेवक वारे सुरेश शंखनाथ यांना ५१ मतदानापैकी ४८ मतदान घेऊन
शिरूर कासार तालुक्याच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली . या निवडीमुळे रोजगार सेवक सुरेश वारे यांच्या पांगरी मारुती गावामध्ये जल्लोष साजरा करून विजयी मिरवणूक काढण्यात आली . यावेळी रोजगार सेवक सुरेश वारे यांनी पुढे बोलताना सांगितले की रोजगार सेवकांच्या विविध अडचणी, रोजगार सेवकांचे प्रश्न , रोजगार सेवक संघटनेच्या अध्यक्ष या नात्याने लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून शासनात कडे मागण्या मान्य करून घेण्याचा , अडचणी दूर, पूर्ण जबाबदारीने काम करण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन देण्यात आले . शिरूर तालुक्यातील सर्व रोजगार सेवकांकडून , व्यापारी संघटने कडून , तसेच शिरूर तालुका व पाटोदा तालुका पत्रकार संघाकडून रोजगार सेवक तालुका अध्यक्ष सुरेश वारे यांचा सत्कार करण्यात आला .

Back to top button