वीरशिरोमनी महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त उद्या अभिवादन सभेचे आयोजन

वीरशिरोमनी महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त उद्या अभिवादन सभेचे आयोजन
सर्व समाज बांधवांनी उपस्थित रहावे क्षत्रिय कुलवंत राजपुत समाजाचे आवाहन
बीड प्रतिनिधी):- महाराष्ट्रासह भारतात वीरशिरोमनी महाराणा प्रताप यांची जयंती दि.9 मे रोजी साजरी केली जाते. त्यांचा जन्म मेवाड येथे 9 मे 1540 साली झाला होता. महाराणा प्रताप हे सिसोदिया कुळातील हिंदू पराक्रमी राजपूत होते. तथापि, ते नायक आणि योद्धा असूनही धर्म पारायण आणि मानवतेचे पुजारी होते. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून बीड येथील क्षत्रिय कुलवंत राजपुत समाज बांधवांच्यावतीने शहरातील यशवंत उद्यान परिसरात असलेल्या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास ठिक सकाळी 9.30 वा. अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राजपुत, गुजर समाज बांधवांसह सर्व महाराणा प्रताप प्रेमींनी या अभिवादन सभेस उपस्थित रहावे असे आवाहन क्षत्रिय कुलवंत राजपुत समाज बांधवांच्यावतीने लक्ष्मणसिंह ठाकूर यांनी केले आहे.
भारत ही शूर वीरांची जन्मभूमी आहे. अशा शूर वीरांपैकी एक आहेत महाराणा प्रताप. महाराणा प्रताप यांचे पूर्वज मेवाडचे शासक आणि भगवान श्रीराम यांनी उत्पन्न केलेले सूर्यवंशी होते. महाराणा प्रताप यांना लहानपनापासूनच राजवाड्या पेक्षा, सामान्य जनतेबरोबर वेळ घालायला जास्त आवडत असे. महाराणा प्रताप यांनी मुघल सम्राट अकबराविरोधात कडवा संघर्ष केला. त्यांनी कधीही अकबरासमोर शरणागती पत्कारली नाही. असे महान वीरशिरोमनी महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त क्षत्रिय कुलवंत राजपुत व गुजर समाज बांधवांच्यावतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले असून सर्व समाजातील महाराणा प्रताप प्रेमींनी या अभिवादन सभेस उपस्थित रहावे असे आवाहन क्षत्रिय कुलवंत राजपुत समाज बांधवांच्यावतीने लक्ष्मणसिंह ठाकूर, जयसिंग मामा चुंगडे, मुन्नाभैय्या हजारी, नगरसेवक राणा चौव्हाण, नगरसेवक सुरज चुंगडे, सुरेश (तात्या) शेटे, नगरसेवक राजाभाऊ गुजर, नितीन राजपुत, संजय बुंदेले, बाळासाहेब गुजर, अंबादास गुजर, अर्जुन बहिरवाळ, सचिन बुंदेले, अखिल बुंदेले, कपूर व सर्व पदाधिकारी व समाज बांधवांच्यावतीने केले आहे.


