संपादकीय

सराव करताना विराट कोहली मांजरीसोबत दिसला खेळताना, अनुष्का म्हणाली…

 

मुंबई | भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली मुंबई क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे सरावासाठी पोहोचला आहे. पहिल्या टेस्ट मॅचमधील हिस्सा नसला तरी कोहली मुंबई येथे खेळवण्यात येणाऱ्या न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये सहभागी होणार आहे.

दुसऱ्या टेस्ट मॅचपूर्वी, विराट कोहलीने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सराव सुरू केला आहे. दरम्यान, त्याने स्टेडिअममधील एक भन्नाट फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. टेस्ट मॅचपूर्वी, विराट कोहलीने आपल्या मांडीवर बसलेल्या मांजरीचा एक फोटो शेअर केला आहे, जो खूप जोरदार व्हायरल होत आहे. त्यावर पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनेही कमेंट केली आहे.

विराट कोहलीने सराव सामन्यादरम्यान मांजरासोबत खेळतानाचे दोन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत विराटने ‘एक हॅलो सराव करताना कुल मांजरीकडून’ असे म्हटले आहे. त्याच हा फोटो पाहून, पत्नी अनुष्का शर्मानेही मांजरीली हॅलो म्हटले आहे..
पण अनुष्काच्या या कमेंटवर भन्नाट रिप्लाय दिला आहे.

Back to top button