संपादकीय

 चिपी विमानतळावर विमानांपेक्षा कोल्ह्यांची वर्दळ अधिक 

चिपी विमानतळ सुरु करण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून अनेक प्रकारचे विघ्न समोर आले आहेत. परंतु आता पुन्हा एकदा नवीन समस्या निर्माण झाली आहे. कारण चिपी विमानतळावर विमानं धावण्याऐवजी कोल्ह्यांची धावपळ सुरू आहे. विमानतळाच्या धावपट्टीवर तब्बल २५ ते ३० सोनेरी कोल्हे वावरत असतात. त्यामुळे आता यावर तोडगा कसा काढणार, हा एक नवीन प्रश्न उपस्थित झाला आहे.
स्थानिक वन विभाग आणि विमान प्राधिकरण यांना या सोनेरी कोल्ह्यांना पकडण्यासाठी परवानगीची गरज आहे. त्यांना पकडल्यानंतर इतर जागी हलवण्याची आवश्यकता आहे. परंतु विमानतळाच्या परिसरात जवळपास २५ ते ३० कोल्ह्यांचा वावर सुरू असून मुंबईवरून सिंधुदुर्गाकडे येणाऱ्या विमानांना उतरण्यास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
मुंबईहून सिंधुदुर्ग या मार्गावर विमानाच्या दररोज तीन फेऱ्या होत असतात. परंतु कोल्ह्यांच्या सिंधुदुर्ग विमानतळावरील धावपट्टीमुळे वैमानिकांना विमान उतरवण्यास मोठा त्रास देखील होत आहे.  या विमानतळाच्या २७५ एकर भूभागाजवळ एक संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे. तसेच विमानतळाभोवती एका मोठे गवत देखील उभे राहीले आहेत. त्यामुळे कोल्ह्यांचा अधिकप्रमाणे वावर वाढत असल्याचं सांगितलं जात आहे.
वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची दोन अंतर्गत कोल्ह्यांना संरक्षण देण्यात आले आहे. हे कोल्हे सर्व प्रकारचे फळं, पक्षी, कीटक, मासे आणि लहान प्रकारचे सस्तन प्राणी खातात. तसेच कोल्ह्याची शिकार करणे किंवा त्यांचा व्यापार करणे हा दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे विमान प्राधिकरणामुळे मोठा पेचप्रसंग उभा राहिला आहे.
Back to top button