आरोग्यबीडराजकीय

मा मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साधणार राज्यातील आशा स्वंयसेविका सोबत संवाद .

रोहिणी कुलकर्णी (गटप्रवर्तक )

धनंजय कुलकर्णी । धारूर

राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत ग्रामीण भागामध्ये कोरोनाच्या संकटामध्ये अतिशय महत्वाची भुमिका बजावणाऱ्या व ग्रामीण भागातील गाव वाड्या तांड्यावरील वस्ती वरील राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या घरी जावून कोरोना चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून आरोग्य प्रशासनास वेळीवेळी या भागाचा सर्वे करून माहिती देवून रुग्णांना कोविड सेटर मध्ये दाखल करण्याचे कार्य केले व ते अविरत हे कार्य त्यांच्या माध्यमातुन चालु आहे अशा सर्व राज्यातील आशा स्वय सेविका सोबत उद्या दिनांक 7 जुन रोजी ठिक दुपारी12:30 वा. मा मुख्यमंत्री .आशास्वयंसेविका बरोबर V/C मिटिंग द्वारे संवाद साधनार आहेत.

तरी सर्व आशाभगिनींना विनंती आहे की त्यांनी वेळेत उपस्थित राहून काहीही कारणे न सांगता. कोणाच्याही अॅनरॉइड मोबाईल वरून VC जॉईन करून त्यांनी विचारलेल्या प्रश्रांची थोडक्यात उत्तरे देणे. नेहमी ज्याप्रमाणे तुम्ही VC जॉईन करत असताना माईक चालू ठेवता त्याप्रमाणे न करता ते काय सांगतात ते नीट ऐकून समजून घेऊन ज्यां आशाना ते प्रश्न विचारतील त्याच आशाने आपला माईक चालू ठेवायचा आहे व त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची व्यवस्थित उतर द्यावयाचे आहे. म्हणजे सदररील VC शिस्तीत संपन्न होईल व विषय सर्वाना समजेल आता या करिता पण अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध करून हि VC ज्वाइन करावी व सर्व अॅक्टीव्ह आशानी मुख्यमंत्र्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करावा. ही विनंती या साठी आज पासूनच तयारी करा या साठी तुम्हाला शुभेच्छा.

काहीही कारण सांगून VC ज्वाइन करणार नाहीत अशा आशाची नोद होणार आहे. त्यामुळे VC जॉईन करणे अनिवार्य आहे.

अशी माहिती रोहिणी कुलकर्णी . गटप्रवर्तक प्रा आ केंन्द्र राजेगाव ता. केज जि.बीड यांनी सर्व आशा स्वय सेविकांना दिली आहे .

Back to top button