संपादकीय

“परिवहन मंत्री केवळ मुख्यमंत्र्यांचे कलेक्टर आहेत – नारायण राणे

 

एसटी महामंडळाचे राज्य सरक्कर्मध्ये विलीनीकरणा व्हावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी आंदोलन करत असून यावर अद्याप तोडगा निघालेला नाहीये त्यातच आता याच मुद्दयावरून केंद्रीय मानती नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना टोला लगावला आहे. परिवहन मंत्री हे केवळ मुख्यमंत्र्याचे कलेक्टर असल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. सावंतवाडीत एसटी आगारात सुरु असलेल्या आंदोलनाला नारायण राणे यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

राणे यावेळी म्हणाले, ‘परिवहन मंत्री जरी कोकणचे असले तरी त्यांना कोकणी माणसाबद्दल विशेष काही आत्मीयता नाही. ते केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कलेक्टर आहेत,’ असा टोला त्यांनी अनिल परब यांना लगावला आहे.शिवाय त्यांनी यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ‘शरद पवार हे कधीही कोणत्याही बाबतीत तोडगा काढणार नाहीत. खेळवत राहणं हे त्यांचं काम आहे,’ अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.

यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ते म्हणाले, ‘एसटी महामंडळ हे सरकारच्या नियंत्रणात येते. मात्र गेले १५ दिवस एसटी कर्मचारी संप करत आहेत. तरीही सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. हा एसटी कर्मचाऱ्यांचा जीवाचा प्रश्न आहे. आतापर्यंत जवळपास ४० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीही राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करून त्यांना अजूनही त्यांना खेळवतच आहे,’ अशी टीका त्यांनी केली आहे.

Back to top button