बीड
सुमनताई विश्वनाथ कदम यांचे दुःखद निधन

सुमनताई विश्वनाथ कदम यांचे दुःखद निधन
बीड प्रतिनिधी: पाटोदा तालुक्यातील सौंदाणा येथील सुमनताई विश्वनाथ कदम यांचे शनिवारी दि.२३ मे रोजी हृदयविकाराने आकस्मित निधन झाले.त्या ८५ वर्षाच्या होत्या. सुमनताई कदम या मनमिळाऊ स्वभावाच्या व आध्यात्मिक वृत्तीच्या होत्या.धार्मिक व सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा.
त्या जामखेड तालुका खादी ग्रामउद्योग संघाचे चेअरमन अंकुशराव उगले यांच्या सासूबाई होत. त्यांच्या पश्चात मुलगी रत्नमाला उगले, नातू, नातसूना,नातवंडे असा परिवार आहे.सुमनताई कदम यांच्या निधनाने सौंदाणा व जामखेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



