पुणे
आष्टी येथील फार्मसी कॉलेज मध्ये तणावमुक्त जीवनासाठी तणाव व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

आष्टी येथील फार्मसी कॉलेज मध्ये तणावमुक्त जीवनासाठी तणाव व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न
आष्टी प्रतिनिधी :-आनंद चॅरिटेबल संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मासुटिकल सायन्स अँड रिसर्च, आष्टी (डी फार्मसी,बी फार्मसी, एम फार्मसी) या औषधनिर्माण फार्मसी कॉलेजमध्ये १० नोव्हेंबर २०२५ रोजी ‘तणाव व्यवस्थापन’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये प्राध्यापक गिरीश कुकरेजा सर बौद्धिकक्षमता कौशल्य प्रशिक्षक विज्ञान संवादक हे व्याख्याते म्हणून होते.
माझा ताण-तणाव ही माझी निर्मिती आहे हे समजून घेणे हेच तणाव व्यवस्थापनाचे पहिले पाऊल आहे. तणाव म्हणजे काय, अभ्यास करताना किंवा इतर गोष्टीमुळे तणाव कसा निर्माण होतो आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या पद्धती अवलंबाव्यात,याबद्दल त्यांनी माहिती दिली. आजच्या आधुनिक जगात आव्हाने शारीरिक पातळीपेक्षा बौद्धिक आणि भावनिक पातळीवर जास्त आहेत. त्यामुळे भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी स्वतःवर नियंत्रण ठेवणे हाच सर्वोत्तम उपाय आहे,
जीवनात येणाऱ्या समस्या व अडचणी कशा दूर करता येतील याविषयी मार्गदर्शन केले, विद्यार्थ्यांशी हितगुज करून, प्रश्नोत्तर स्वरुपात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, ताण-तणाव- नैराश्य यामुळे टोकाचा निर्णय न घेता, सदर समस्या हसत-खेळत मित्र-मैत्रिणींशी चर्चा करून आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींशी विचार विनिमय करून समस्येवर योग्य तो निर्णय घेऊन समस्या सोडवावी , आई वडिलांचे, शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे जेणेकरून ताण-तणाव मुक्त आयुष्य जगता येईल, यासाठी प्रयत्न करावेत, असे मार्गदर्शन व्याख्याते प्रा. गिरीश कुकरेजा यांनी केले. कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन केल्यामुळे कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुनील कोल्हे यांनी प्रा.कुकरेजा सरांचे आभार मानले , आजच्या या कार्यशाळेप्रमाणे विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी विद्यार्थ्यांना सर्व विषयाचे ज्ञान देण्यासाठी विविध वेगवेगळ्या विषयावर कार्यशाळेचे आयोजन या कॉलेजमध्ये इथून मागेही केलेले आहे यापुढेही केले जाईल असे प्राचार्यांनी सांगितले या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन व्यवस्थापन कॉलेजमधील
सहाय्यक प्राध्यापक श्री.धायगुडे अनिल आणि श्री मोरे सागर यांनी केले होते.
या कार्यशाळेला कॉलेजमधील सर्व शिक्षक व शिक्षकत्तेर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
