महाराष्ट्र

महापुरुषांच्या विचारांचे वारसदार होऊया की पुतळ्याचे अन प्रतिमेचे !

 

मुंबई | आजवर अनेक थोर महापुरुष या भारत भूमीला लाभून गेले आहेत, काहींनी आपल्या नव्या विचारातून देशात बदल घडवले तर काहींनी स्वतंत्र संग्रामात बलिदान देऊन या देशाला गोऱ्यांच्या तावडीतून सोडवून नवी क्रांती घडवली. आजवर असे अनेक महापुरुष या भारतभूमीवर होऊन गेले आहेत आणि त्यांच्याच विचाराने आजचा समाज घडताना दिसत आहे.

आज अशाच एका थोर महापुरुषाची जयंती सर्वत्र साजरी होताना दिसत आहे. ते महापुरुष म्हणजे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, आज सर्वत्र त्यांची जयंती साजरी होताना दिसत आहे. आज कुठे त्यांच्या पुतळ्याला मोठे हार घातले जात आहे तर कुठे-कुठे चौकाचौकात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले जात आहे.

पण आज महापुरुषांच्या प्रतिमा, फोटो आणि निर्जीव पुतळे महत्वाचे की त्यांचे विचार, कारण आजचा शिक्षित समाज फक्त त्यांच्या निर्जीव पुतळ्यात आणि फोटोत गुरफटलेला असून त्यांच्या विचारापासून फारच दूर गेला आहे. म्हणूनच पुतळे महत्वाचे की ज्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे त्या महापुरुषाचे विचार महत्वाचे असाच प्रश्न निर्माण होत आहे.

आज पाठयपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा शिकवला जाणारा इतिहास फक्त चौथीचा विद्यार्थी पास होण्यापुरताच लक्षात ठेवतो कारण तो त्याच्या शिक्षणाचा भाग असतो. पण त्या महापुरुषांचे विचार आजच्या पिढीला नवी दिशा देऊ शकतात हे आद्यपही त्या विद्यार्थाला समजलेले नाही कारण महापुरुष हे फक्त जयंती आणि पुण्यतिथी निमित्त महत्वाचे असतात हे त्याच्या मनावर बिंबवले जात असते. त्यामुळेच आज पुतळे आणि प्रतिमेला पुजण्यापेक्षा त्यांच्या विचाराचे पूजन झाले तर नक्कीच समाजामध्ये आमूलाग्रह बदल होऊ शकतो.

Back to top button